​अश्विनी भावे अमेरिकेत मिस करते भारतीय जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2017 09:28 AM2017-02-08T09:28:06+5:302017-02-08T14:58:06+5:30

अश्विनी भावेने कळत नकळत, अशी ही बनवा बनवी अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच आर.के बॅनर्सच्या हिना ...

Indian food that Ashwini Bhave misses in America | ​अश्विनी भावे अमेरिकेत मिस करते भारतीय जेवण

​अश्विनी भावे अमेरिकेत मिस करते भारतीय जेवण

googlenewsNext
्विनी भावेने कळत नकळत, अशी ही बनवा बनवी अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच आर.के बॅनर्सच्या हिना या चित्रपटात ती ऋषी कपूरची नायिका होती. या चित्रपटात तिने सादर केलेले आजावे माही... या गाण्यावरील नृत्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अश्विनीने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीत दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने अनेक नाटकांमध्येदेखील काम केले आहे. 
अश्विनीचे करियर जोरात असतानाच ती लग्न करून अमेरिकेला निघून गेली. अश्विनीने अभिनयातून संन्यास घेतला असेच त्यावेळी सगळ्यांना वाटले होते. पण 10 वर्षांच्या ब्रेकनंतर ती कदाचित या चित्रपटात झळकली. तिच्या या कमबॅक मूव्हीचे सगळ्यांनीच कौतुक केले. आता ती ध्यानीमनी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत महेश मांजरेकर, मृण्मयी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सध्या अश्विनी भारतात आली आहे. भारतात आल्यानंतर अश्विनी भारतीय जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेते. तिच्या भारतीय जेवणाच्या प्रेमाविषयी ती सांगते,  "मी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असताना भारतीय जेवण खूप मिस करते. त्यामुळे भारतात आल्यावर मी मटण, मासे आवर्जून खाते. मी भारतातून सगळे मसाले घेऊन जाते. तसेच आमच्या येथेदेखील मटण मिळते. त्यामुळे मी माझ्या घरी मटण बनवते. पण आपल्याकडच्या मटणाची चव त्याला येत नाही. आपल्याकडचे मटण हे खूपच ताजे असते. तसेच आपल्याप्रमाणे ताजे मासेदेखील मला तिथे मिळत नाहीत. त्यामुळे मी भारतात आल्यावर मटण आणि मासे यांवर ताव मारते. मी येथे आल्यावर माझे डायटिंग वगैरे सगळेच विसरून जाते." 


Web Title: Indian food that Ashwini Bhave misses in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.