'झाडाला मिठी मारून प्रेम दाखवण्यापेक्षा…', सुमीत राघवनचे ट्वीट आले चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 09:21 PM2022-07-11T21:21:37+5:302022-07-11T21:22:14+5:30
Sumeet Raghvan: सुमीत राघवनने आरे मेट्रो प्रकरणात राज्य सरकारच्या निर्णयाला पुन्हा एकदा पाठिंबा दिला आहे.
अभिनेता सुमीत राघवन ( Sumeet Raghvan ) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय मुद्यांवर तो त्याचे परखड मत मांडत असतो. आता त्याने आरे मेट्रो प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर निशाणा साधला आहे. ‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी भूमिका नव्या सरकारने घेतली आहे. मात्र, मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असे ठाम मत व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा’ची हाक दिली आहे. सुमीत राघवनने काही दिवसांपूर्वी ‘कारशेड वही बनेगा’ म्हणत ट्विट केले होते. यासगळ्यात आता त्याने पुन्हा एकदा ट्विट केले आहे, जे चर्चेत आले आहे.
सुमीतने त्याच्या ट्विटरवर पोस्ट शेअर करत आरे मेट्रो प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर निशाणा साधला आहे. त्याने ट्विट केले की,आंदोलकांनी नुसते फलक घेऊन, झाडाला मिठी मारून प्रेम दाखवण्यापेक्षा जरा स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून पर्यावरणासाठी काहीतरी चांगले करायला सांगा. समाजाचे आणि प्राण्यांचे भले करा. आपलं योगदान करत महाराष्ट्र सरकारचा भार थोडा हलका करा, बरोबर?.
amongst the protesters. Instead of just standing with placards and hugging trees to show their love,tell them to spend money from their pockets and do something useful. Do good for the society as well as for these animals. GoM ka bhaar thoda halka karo by contributing. Right?
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 9, 2022
2/n pic.twitter.com/77T4DBiQ7T
Get this fact straight,even the carshed supporters aren't against the environment. But it's time to wake up and smell the coffee. Don't spread false narratives by stating "facts" that suit you and your clan.
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 9, 2022
👇#CarShedWahiBanega
Meet Sanjay Kamble at SGNP for more details.
3/3 pic.twitter.com/FOFFDtrCgV
पुढे सुमीत राघवननं आणखी एक ट्वीट केलं आहे. यात तो म्हणाला, “कारशेड समर्थक देखील पर्यावरणाच्या विरोधात नाही, हे सत्य जाणून घ्या. तुम्हाला आणि तुमच्या पिढीला योग्य वाटेल ते सांगून काही खोटं पसरवू नका. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील संजय कांबळे यांना भेटा, म्हणजे कळेल.