Interesting:रणवीर सिंगने ट्वीटरद्वारे केले 'भिकारी'चे टिजर पोस्टर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 09:41 AM2017-06-13T09:41:52+5:302017-06-13T15:15:26+5:30

मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच गणेश आचार्य  दिग्दर्शित 'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' या ...

Interesting: Ranveer Singh launched a tweet poster of 'Bhikari' by a tweeter | Interesting:रणवीर सिंगने ट्वीटरद्वारे केले 'भिकारी'चे टिजर पोस्टर लाँच

Interesting:रणवीर सिंगने ट्वीटरद्वारे केले 'भिकारी'चे टिजर पोस्टर लाँच

googlenewsNext
मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच गणेश आचार्य  दिग्दर्शित 'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' या चित्रपटाची  घोषणा झाल्यापासून सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच रसिकांप्रमाणे बॉलिवूडकरांनाही या  सिनेमाची कमालीची उत्सुकता पाहायला मिळते.त्यामुळेच खुद्द रणवीर सिंग याने आपल्या सोशल साईटवर 'भिकारी' सिनेमाचे टीजर पोस्टर ट्वीट करत, सिनेमाच्या संपूर्ण टीमला भरपूर शुभेच्छा देखील दिल्या.गेल्यावर्षी मोठ्या गाजवाजात या चित्रपटाचा महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या हस्ते मुहूर्त  करण्यात आला होता.  या पोस्टरवर छत्री तोंडावर घेऊन एक मनुष्य झोपला असल्याचे चित्र आपल्याला दिसून येते. सुटाबुटात असलेला हा मनुष्य मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी असावा असे वाटते, परंतु छत्रीत त्याचे तोंड झाकले असून, त्याच्या शेजारी भिकारीचं  वाडगं दिसत असल्यामुळे, या टिजर पोस्टरवरील मनुष्य स्वप्नीलच आहे का? आणि त्याची या सिनेमात नेमकी काय भूमिका आहे, असे अनेक प्रश्न पडतात. अशाप्रकारे आपल्याला नकळत संभ्रमात  टाकणा-या या  टिजर पोस्टरने, अल्पावधीतच सोशल साईटवर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. 





स्वप्नीलदेखील या सिनेमाबाबत खूप उत्सुक आहे.आतापर्यतच्या भूमिकेहून अगदी वेगळी अशी भूमिका सिनेमात असल्यामुळे हा चॉकलेट बॉय 'भिकारी' सिनेमामध्ये नेमका काय करणार हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे.बॉलिवूडचे आघाडीचे  नृत्यदिग्दर्शक  गणेश आचार्य यांनी याआधी काही हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. मात्र, मराठीत ते पहिल्यांदाच 'भिकारी' या सिनेमाच्या माध्यमातून मारठीत पदार्पण करत आहेत. तसेच गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रॉडक्शनची स्थापना करून चित्रपट निर्मितीमध्ये प्रथम पाऊल टाकले आहे. या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद तसेच गीत गुरु ठाकूर यांचे असून, त्यांनी यात अभिनय देखील केला आहे. आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर आधारित असलेल्या या सिनेमात रुचा इनामदार, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काबरा अशी तगडी स्टारकास्टदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवाय  एक हजार कलाकारांचा सहभाग असलेले 'गजानना' हे भव्य गाणे देखील या सिनेमाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.गणेश आचार्य यांनी कोरियोग्राफ केलेले हे गाणे बॉलिवूडच्या गाण्यांना टक्कर देणारे असेच आहे.मराठी गाण्यांच्या चित्रीकरणात ते 'सुपरसॉंग' ठरणार असल्याचा अंदाज  देखील लावला जात आहे. छायाचित्रकार महेश लिमये यांच्या कॅमे-यातून 'भिकारी' सिनेमा साकार झाला असल्यामुळे चित्रीकरणात देखील तो समृध्द ठरला आहे. या चित्रपटाचा आशय, बांधणी आणि निर्मितीमूल्य पाहता 'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' हा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित होणार असून इतर  मराठी चित्रपटांप्रमाणे बिगबजेट सिनेमा ठरणार असल्याचेही गणेश आचार्य यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Web Title: Interesting: Ranveer Singh launched a tweet poster of 'Bhikari' by a tweeter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.