कमाल! एका मिनिटात सायलीने केलं शीर्षासन; व्हिडीओ पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 03:40 PM2023-06-21T15:40:12+5:302023-06-21T15:40:57+5:30

Sayali sanjeev: सायलीने योग करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत नेटकऱ्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, असं सांगायचा प्रयत्न केला आहे.

international yoga day marathi actress sayali sanjeev share yog video on instagram | कमाल! एका मिनिटात सायलीने केलं शीर्षासन; व्हिडीओ पाहून चाहते झाले थक्क

कमाल! एका मिनिटात सायलीने केलं शीर्षासन; व्हिडीओ पाहून चाहते झाले थक्क

googlenewsNext

सध्याच्या घडीला कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत चांगलेच सजग आहेत. त्यामुळे वरचेवर ते त्यांच्या योग करतानाचे, वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यावेळी जागतिक योग दिनाचं निमित्त साधून अभिनेत्री सायली संजीव (sayali sanjeev) हिने योगासन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच तिचा फिटनेस फंडाही तिने सांगितला आहे.

'काहे दिया परदेस' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सायली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. उत्तम अभिनयामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सायलीचे आज असंख्य चाहते आहेत. त्यामुळे या चाहत्यांसाठी ती कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यावेळी तिने योग करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत नेटकऱ्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, असं सांगायचा प्रयत्न केला आहे.

सायलीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती शीर्षासन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ती त्या सहजपद्धतीने हे आसन करतीये ते पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतकंच नाही तर तुझा फिटनेस मंत्रा आज समजला असंही अनेकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून सायली सातत्याने चर्चेत येत आहे. सध्या तरी तिने चित्रपटांचा धडाका लावला आहे. सातारचा सलमान, मन फकिरा, झिम्मा, गोष्ट एका पैठणीची, हर हर महादेव, दाह अशा कितीतरी सिनेमात ती झळकली आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results


 

Web Title: international yoga day marathi actress sayali sanjeev share yog video on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.