Interview : उत्कंठा वाढविल्यास मराठी चित्रपट यशस्वी- समीर आशा पाटील !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 12:40 PM2018-02-03T12:40:24+5:302018-02-03T18:27:06+5:30

-रवींद्र मोरे  चौर्य सारख्या रहस्यपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकाची छाप टाकणाऱ्या समीर आशा पाटील यांचा यंटम हा चित्रपट नुकताच ...

Interview: Marathi film will be successful if you want to excite - Sameer Asha Patil! | Interview : उत्कंठा वाढविल्यास मराठी चित्रपट यशस्वी- समीर आशा पाटील !

Interview : उत्कंठा वाढविल्यास मराठी चित्रपट यशस्वी- समीर आशा पाटील !

googlenewsNext
ong>-रवींद्र मोरे 
चौर्य सारख्या रहस्यपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकाची छाप टाकणाऱ्या समीर आशा पाटील यांचा यंटम हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. नावापासूनच आपलं वेगळेपण जपलेल्या 'यंटम' या चित्रपटाच्या प्रवासाबाबत समीर पाटलांशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!

* यंटम हा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला आला आहे, कथानकाविषयी काय सांगाल ?
- हा चित्रपट प्रेम कथेवर आधारित असून सनई, वाद्य व वादकाची गोष्ट आहे. यंटमचा अर्थ म्हणजे झपाटून जाणे. यात एका मुलाच्या वडिलांचा व्यवसाय सनई वादकाचा आहे, मात्र त्या मुलास सनई आवडत नाही. पण तो ज्या मुलीवर प्रेम करतो तिला मात्र सनई खूपच आवडते. मग तिच्या प्रेमासाठी तो सनई कसा शिकतो हे अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहे.

* यंटम हा चित्रपट रसिकांना एक म्यूझिकल ट्रिट ठरणार आहे, चित्रपटाच्या संगीताविषयी काय सांगाल ?
- म्यूझिक हा या चित्रपटाचा कणा आहे. विशेष म्हणजे जरी यात सनईसारख्या वाद्यावर फोकस करण्यात आले आहे, तरी थीम मात्र आधुनिकतेवर आधारित आहे.  चित्रपटाच्या कथानकाला साजेशी आणि तरूणाईला आवडतील अशी गाणी यात आहेत. "यंटम"चं संगीत हा वेगळा प्रयोग ठरला आहे.  'चित्रपटाचं संगीत करताना त्याच्या कथेचा, त्यातल्या वातावरणाचा, भाषेचा विचार करावा लागतो. 'यंटम'च्या कथानकात वेगळेपण आहे. हे कथानक संगीतप्रधान आहे. त्यामुळे दीड ते दोन वर्ष संगीतावर भर द्यावा लागला.

* सद्या मराठी चित्रपट यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या जातात, तरीही अपेक्षित यश मिळत नाही, मराठी चित्रपट यशस्वी होण्यासाठी अजून कोणते प्रयत्न अपेक्षित आहेत?
- मराठी चित्रपटांना सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटांची. ज्यादिवशी मराठी चित्रपट प्रदर्शित होतो त्याच काळात एखादा हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला असतो. याचा परिणाम मराठी चित्रपटांवर होतो. मराठी चित्रपट यशस्वी होण्यासाठी मातीशी नाळ असलेले चित्रपट बनविले गेले पाहिजेत, शिवाय कथानकही दमदार असायला हवे. उदा. सैराट हा त्याच आशयाचा होता, म्हणून यशस्वी झाला.

* कधी कधी वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाना थियटर मिळत नाही, याबाबत काय सांगाल ?
-ही एक स्पर्धा आहे, यात प्रत्येकजण स्वार्थ बघणारच. यासाठी मात्र मराठी चित्रपटांनी प्रयत्नशील असायला हवे. त्यासाठी चित्रपटाच्या शूटिंग पासून प्रदर्शित तारीखपर्यंत चित्रपटाची उत्कंठा वाढवून ठेवली तर थियटर मिळण्याची वाट पाहावी लागणार नाही. आपोआपच थियटर मिळतील आणि चित्रपट यशस्वी होतील.

* आपल्या पुढील नियोजनाबद्दल काय सांगाल?
- चौर्य हा रहस्यपट होता, नुकताच रिलीज झालेला यंटम हा लव स्टोरी आणि आगामी चित्रपट हा कॉमेडी असेल, त्यावर कामही सुरु झाले आहे, मात्र सध्या सर्व फोकस यंटम चित्रपटावरच आहे. आगामी चित्रपटाविषयी लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.

Web Title: Interview: Marathi film will be successful if you want to excite - Sameer Asha Patil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.