प्रसाद ओक मराठीमधला Highest Paid अभिनेता आहे? म्हणाला- "दोन व्यक्ती याचं उत्तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 11:51 AM2024-07-23T11:51:34+5:302024-07-23T11:52:09+5:30

प्रसाद मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार आहे का? यावर त्याने मौन सोडलंय (prasad oak)

Is actor Prasad Oak is Highest Paid Actor in Marathi dhramaveer 2 actor revealed | प्रसाद ओक मराठीमधला Highest Paid अभिनेता आहे? म्हणाला- "दोन व्यक्ती याचं उत्तर..."

प्रसाद ओक मराठीमधला Highest Paid अभिनेता आहे? म्हणाला- "दोन व्यक्ती याचं उत्तर..."

अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेल्या 'धर्मवीर २' चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रसाद आगामी विविध सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच 'आरपार' या पॉडकास्ट मुलाखतीत प्रसाद मराठीतला सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार आहे का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावेळी प्रसादने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

प्रसाद सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार?

'आरपार ऑनलाईन' या पॉडकास्टच्या मुलाखीदरम्यान प्रसाद म्हणाला, "हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा हाययेस्ट व्ह्यूड (viewed) अभिनेता असणं माझ्यासाठी  खूप महत्त्वाचं आहे. मी हाययेस्ट पेड अभिनेता आहे का हे दोन माणसांना विचारावं.. मंजिरी ओक आणि मंगेश देसाई..  मंजिरी माझा सर्व व्यवहार सांभाळते. तर मंगेश देसाई सिनेमाचे निर्माते आहेत. ही दोन माणसं याबद्दल सांगू शकतील. पण मला असं वाटतं हल्ली हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा आपण हाययेस्ट रिड ( Read ) कलाकार आहोत का? आपल्याबद्दल लोक किती वाचतात किंवा हाययेस्ट वेड लावणारा अभिनेता आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं"

प्रसाद ओक एक बहुआयामी कलाकार

मराठी इंडस्ट्रीत सध्या प्रसाद ओक अनेक दमदार भूमिका साकारत आहे. याशिवाय चंद्रमुखी, कच्चा लिंबू अशा सिनेमांचं दिग्दर्शन असो किंवा अगदी महाराष्ट्राची हास्यजत्रा मधली त्याची मार्मिक टिपण्णी असो. प्रसाद हा बहुआयामी कलाकार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्रसादच्या आगामी 'धर्मवीर २'ची उत्सुकता शिगेला आहे. आगामी काळात प्रसाद अनेक वैविध्यपूर्ण भूमिका करणार असल्याचं देखील कळतंय. 

Web Title: Is actor Prasad Oak is Highest Paid Actor in Marathi dhramaveer 2 actor revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.