'झलक दिखला जा'मध्ये अमृता खानविलकरचा परफॉर्मन्स बिघडला?, या पोस्टमुळे चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 19:35 IST2022-09-14T19:34:00+5:302022-09-14T19:35:01+5:30
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर सध्या झलक दिखला जा १०मध्ये पाहायला मिळत आहे.

'झलक दिखला जा'मध्ये अमृता खानविलकरचा परफॉर्मन्स बिघडला?, या पोस्टमुळे चर्चेला उधाण
मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने मराठी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. तसेच तिने राझी, मलंग या हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. सध्या ती छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो झलक दिखला जामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या शोसाठी ती प्रचंड मेहनत घेते आहे. पण नुकतेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टनंतर अमृता शोमधून बाहेर तर पडणार नाही, अशी चर्चा होताना दिसते आहे.
झलक दिखला जाच्या स्टेजवर अमृताचा एक परफॉर्मन्स चांगला झाला नाही आणि त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर सांगितले की, नमस्कार, नुकताच माझा परफॉर्मन्स संपवला, पण अजिबात चांगल्या स्थितीत नाही. मला बरं वाटत नाही. आशा आहे देव मला आणखी एक संधी देईल. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर तिच्या चाहत्यांनी तिला चांगला पाठिंबा दर्शवला आहे.
Hi guys I just finished My performance … and not in a good state and not feeling good … hope god will give another chance 🙏🏻 #JhalakDikhhalajaa10#familyweek vulnerable 🙏🏻
— Amruta Khanvilkar (@AmrutaOfficialK) September 13, 2022
आगामी प्रोजेक्ट...
अमृता खानविलकर हॉटस्टारवरील लूटेरे या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. याचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला. त्यात अमृताची छोटीशी झलक पाहायला मिळाली. तिच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. लूटेरेची कथा सत्य घटनेवर प्रेरीत काल्पनिक थ्रिलर ड्रामा आहे. ही एका मोठ्या कमर्शियल भारतीय जहाजाची कथा आहे. ज्याचे सोमालियच्या तटावरून अपहरण केले जाते. इथूनच सीरिजच्या कथेला सुरूवात होते. या सीरिजची शूटिंग युक्रेन, केप टाऊन आणि दिल्लीमध्ये करण्यात आली आहे. अमृता व्यतिरिक्त या सीरिजमध्ये रजत कपूर मुख्य भूमिकेत आहेत.