'फॅंड्री' चित्रपटातील जब्या दिसणार या चित्रपटात, त्याला आता ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 07:00 AM2021-10-03T07:00:00+5:302021-10-03T07:00:00+5:30

फॅन्ड्री चित्रपटात जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडेने साकारली होती. या चित्रपटातून त्याला घराघरात ओळख मिळाली होती.

It is difficult to recognize him now as he will be seen in the movie 'Fandry' | 'फॅंड्री' चित्रपटातील जब्या दिसणार या चित्रपटात, त्याला आता ओळखणं झालंय कठीण

'फॅंड्री' चित्रपटातील जब्या दिसणार या चित्रपटात, त्याला आता ओळखणं झालंय कठीण

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहेत, ज्या चित्रपटांनी संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले होते. असाच एक चित्रपट म्हणजे फॅन्ड्री. फॅन्ड्री चित्रपटात जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडेने साकारली होती. या चित्रपटातून त्याला घराघरात ओळख मिळाली होती. त्यानंतर आता तो एका नव्या सिनेमातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे. फ्री हिट दणका. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 

एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून हा चित्रपट १७  डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुनील मगरे दिग्दर्शित या चित्रपटात फँड्री फेम सोमनाथ अवघडे, अपूर्व एस.यांच्यासह 'सैराट' चित्रपटातील जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या)  यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांचीच असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि  सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.


प्रेमाच्या महिन्याचे औचित्य साधून या प्रेमकथा असलेल्या 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता लवकरच प्रेक्षकांना या  प्रेमाचा दणका चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

Web Title: It is difficult to recognize him now as he will be seen in the movie 'Fandry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.