फेसबुकच्या एका मॅसेजने ती झाली हिरोईन!!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 04:11 AM2018-03-27T04:11:22+5:302018-03-27T09:41:22+5:30

चंदेरी दुनियेत अनेक गोष्टी चमत्कारिक घडतात. एका रात्रीत कुणी स्टार होतं तर एका सिनेमाने कुणी यशाच्या उंच शिखरावर जाऊन ...

It was with a message from Facebook that Heroine !!! | फेसबुकच्या एका मॅसेजने ती झाली हिरोईन!!!

फेसबुकच्या एका मॅसेजने ती झाली हिरोईन!!!

googlenewsNext
देरी दुनियेत अनेक गोष्टी चमत्कारिक घडतात. एका रात्रीत कुणी स्टार होतं तर एका सिनेमाने कुणी यशाच्या उंच शिखरावर जाऊन बसतं. असंच काही अनपेक्षित आणि चमत्कारिक घडलं आहे, योगिता चव्हाण बद्दल आणि तिचा पहिला सिनेमा आहे, गावठी. जो ३० मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे.

योगिताला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती. कॉलेजमध्ये असताना ती मराठी बाणा हा कार्यक्रम करायची. २०१६ मध्ये ती श्रावण क्वीनची फर्स्ट रनरप ठरली. यानंतर तिने रासलीला हे नाटक सुद्धा केले. एक दिवस घरी असताना फेसबुक बद्दल उत्सुकता असल्याने सहज म्हणून चुकून फेसबुक अकाऊंट तयार केले. मग सहजच म्हणून त्यावर काही फोटो टाकले.काही दिवसातच फेसबुकवर दिग्दर्शक आनंद कुमार (अँडी) यांचा मॅसेज आला. आमच्या सिनेमात हिरोईन होशील का म्हणून. मला आधी हे सर्व खरं वाटेना. मग मी त्यांना भेटली. छोटीशी ऑडिशन झाली आणि काही क्षणातच माझी निवड झाली, विशेष बाब म्हणजे जेव्हा मी भेटायला गेले होते तेव्हा माझ्या दातांना तार लावली होती, तरीही त्यांनी माझी निवड केली. 

गावठी सिनेमातल्या आपल्या अनुभवाबद्दल योगिता सांगते की, शूटिंग सुरू झालं तेव्हा मला दडपण आलं होतं, कारण इतक्या झटक्यात इथे कुणाला असं काही मिळत नाही. यावेळी सह कलाकारांनी देखील मला खूप मदत केली. गावठी मध्ये मी गौरी नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. गौरी ही खुपच साधी, भोळी, निरागस अशी आहे. लहानपापासून तिची आणि गजाननची मैत्री आहे. वयात आल्यावर मैत्री प्रेमात बदलते. सिनेमात माझा नायक श्रीकांत पाटील याने देखील मला चांगली साथ दिली आहे. नागेश भोसले माझ्या वडिलांच्या भूमिकेत आहे. त्यांच्या सोबत सीन करतांना भीती वाटली होती, पण काम सुरू झाल्यावर तेही दडपण निघून गेलं. शिवाय सिनेमात किशोर कदम, वंदना वाकनिस यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. दिग्दर्शक आनंद कुमार (अँडी) यांच्या मार्गदर्शनामुळेच मी ही भूमिका करू शकले आहे. ३० मार्चपासून गावठी हा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी नक्की बघावा.

Web Title: It was with a message from Facebook that Heroine !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.