जब्या आणि शालूनं खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ?, फोटो होतोय व्हायरल; नेटकरी म्हणताहेत...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 12:05 PM2024-12-04T12:05:47+5:302024-12-04T12:06:34+5:30
सोशल मीडियावर सोमनाथ अवघाडे (Somnath Awaghade) आणि राजेश्वरी खरात(Rajeshwari Kharat)चा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. त्यात ते दोघे वर आणि वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहेत.
२०१३ साली नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित फॅंड्री चित्रपट (Fandry Movie) सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आणि त्यातील गाण्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या सिनेमातील जब्या आणि शालूची लव्ह केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली. आजही दोघे प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. या चित्रपटात जब्याची भूमिका सोमनाथ अवघाडे (Somnath Awghade)ने आणि शालूची भूमिका राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) ने साकारली होती. या चित्रपटानंतर त्या दोघांची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. सध्या त्यांच्या लग्नाच्या गेटअपमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहून नेटकरी त्यांनी लग्न केल्याचे बोलत आहेत.
सोशल मीडियावर सोमनाथ अवघाडे आणि राजेश्वरी खरातचा एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. त्यात ते दोघे वर आणि वधूच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. डोक्याला मुंडावळ्या, सोमनाथने गोल्डन रंगाची शेरवानी परिधान केली आहे तर राजेश्वरीने मोरपंखी रंगाची साडी नेसली आहे. या फोटोत ते पोझ देताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो पाहून त्या दोघांनी लग्न केले असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
जब्या आणि शालूच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बऱ्याच जणांनी म्हटलं की, जब्या ला गोरी चिमणी गावली राव. एका युजरने लिहिले की, कोणत्या चिमणीची राख होती जब्या. दुसऱ्या युजरने लिहिले की, काळी नाय पण गोरी चिमणी भेटली जब्याला. आणखी एकाने लिहिले की, का माहिती नाही पण यांना लग्न होयला पाहिजे. दुसऱ्याने म्हटले की, रिलॅक्स गायीज शूटिंग चालू आहे... जब्याच नाय एवढं नशीब.
व्हायरल फोटो मागचं सत्य
खरंतर सोमनाथ आणि राजेश्वरीने खऱ्या आयुष्यात लग्न केलेलं नाही. हा फोटो त्यांच्या आगामी सिनेमातील असण्याची शक्यता आहे. अद्याप या संदर्भात माहिती मिळू शकलेली नाही.