जय मल्हार फेम ​देवदत्त नागे बनला निर्माता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 09:54 AM2017-08-12T09:54:04+5:302017-08-12T15:24:04+5:30

जय मल्हार या मालिकेतील खंडेराय या भूमिकेमुळे देवदत्त नागे हे नाव घराघरात पोहोचले. त्याच्या जय मल्हार या मालिकेने काही ...

Jai Malhar Fame Devdatta Naga became the producer | जय मल्हार फेम ​देवदत्त नागे बनला निर्माता

जय मल्हार फेम ​देवदत्त नागे बनला निर्माता

googlenewsNext
मल्हार या मालिकेतील खंडेराय या भूमिकेमुळे देवदत्त नागे हे नाव घराघरात पोहोचले. त्याच्या जय मल्हार या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरी आजही प्रेक्षकांच्या मनात या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा ताजी आहे. गेल्या तीन वर्षांपासून जय मल्हार या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले होते. खंडोबा या व्यक्तिरेखेला तर चाहत्यांचे विशेष प्रेम लाभले होते. गेल्या तीन वर्षांपासून खंडेराया याच भूमिकेत प्रेक्षकांनी देवदत्तला बघितले आहे. देवदत्तने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आता या मालिकेनंतर तो चित्रपटात झळकणार आहे. तो सध्या वेलकम टू पट्टाया या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा देवदत्त पाहायला मिळणार आहे. वेलकम टू पट्टाया या चित्रपटात त्याच्यासोबत वरद चव्हाण आणि विजय चव्हाण यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
देवदत्त सध्या वेलकम टू पट्टाया या चित्रपटाच्या चित्रीकरणात चांगलाच व्यग्र आहे. या चित्रपटानंतर त्याचा आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. देवदत्त अभिनयानंतर आता निर्मितीकडे वळणार आहे. चेंबूर नाका असे त्याच्या पुढील चित्रपटाचे नाव असून डॉ. सीमा नीतनावरे यांच्यासोबत तो या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात तो प्रेक्षकांना प्रमुख भूमिकेत देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय विद्याधर जोशी, उषा नाडकर्णी, मिलिंद शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक नितेश एम पवार असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. 

Also Read : ​देवदत्त नागेनी दाखविली अलिबागच्या रस्त्याची दैना; नेटिझन्सनी म्हटले ‘देवा आता तुम्हीच काहीतरी करा’!

Web Title: Jai Malhar Fame Devdatta Naga became the producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.