Janmashtami 2018 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मराठी गीतांची मैफिल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 02:25 PM2018-09-02T14:25:09+5:302018-09-02T14:25:53+5:30
आज कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे सामाजिकता, आध्यात्मिकता, एकता आणि व्यवस्थापकीय कौशल्य दाखवणारा सण आहे.
आज कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे सामाजिकता, आध्यात्मिकता, एकता आणि व्यवस्थापकीय कौशल्य दाखवणारा सण आहे. अनेक पद्धतींनी वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरांनुसार हा सण संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्ण म्हणजे विष्णूचा आठवा अवतार. भगवान विष्णूने पृथ्वी तलावर घेतलेल्या अवतारांपैकी कृष्ण हा विष्णूचा एकमेव पूर्णावतार आहे. श्रीकृष्ण आणि रासलीला हे जुळलेलं समीकरण. कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्याला भूरळ घालतात. काहींना त्याचं रूप भूरळ घालतं तर काहींना त्याची बुद्धिमत्ता भावते. खरं पाहायला गेलं तर कृष्ण म्हणजे साधा सरळ, लाडिक आणि त्यातून जीवनाचा सार सांगणारा उत्तम वक्ता. संपूर्ण जगाला कृष्णाच्या मोहक रूपाची भूरळ पडली आहे. अशातच श्रीकृष्णावर अनेक गाणी रचली आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतही अनेक श्रीकृष्णाला अर्पण केलेली गाणी, भावगीतं आहेत. अशीच काही गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...
1. सांगा मुकूंद कुणी हा पाहिला
चित्रपट – अमर भुपाळी
2. कशी गवळण राधा बावरली
चित्रपट: एक गाव बारा भानगडी
संगीत दिग्दर्शक: राम कदम
गायक: सुमन कल्याणपूरकर
3. अगं नाच नाच राधे उडवुया रंग
चित्रपट: गोंधळात गोंधळ
गायक: सुरेश वाडकर, उत्तरा केळेकर
4. सांज ये गोकुळी सावळी सावळी
चित्रपट: वजीर
गायक: आशा भोसले.
संगीत दिग्दर्शक: श्रीधर फडके
5. घननीळा, लडिवाळा झुलवु नको हिंदोळा
चित्रपट – उमज पडेल तर
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
6. झुलतो बाई रासझुला
चित्रपट: जानकी
गायक: लता मंगेशकर
7. किती सांगू मी सांगू कुणाला
चित्रपट: सतीचं वाण
गीत: जगदीश खेबुडकर
संगीत: प्रभाकर जोग
गायक: आशा भोसले
8. आज गोकुळात रंग खेळतो हरी
गायक: लता मंगेशकर
9. अरे मनमोहना कळली नाही तुला
चित्रपट: बाळा गाऊ कशी अंगाई
गायक: आशा भोसले
संगीत दिग्दर्शक: एन. दत्ता