By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:13 AM2016-01-16T01:13:53+5:302016-02-06T12:16:44+5:30
पॅरिसवर झालेल्या हल्लय़ानंतर सोशल मीडियावर शांतताप्रिय नागरिकांनी अनेक संदेशांचे आदान- प्रदान केले. यात फ्रान्सच्या नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी आयफेल टॉवर ...
Next
/>पॅरिसवर झालेल्या हल्लय़ानंतर सोशल मीडियावर शांतताप्रिय नागरिकांनी अनेक संदेशांचे आदान- प्रदान केले. यात फ्रान्सच्या नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी आयफेल टॉवर आणि शांततेचे चिन्ह यांची सांगड घातली गेली. अनेक सेलिब्रेटींनी या चिन्हाचा वापर केला. अनेक वृत्तवाहिन्यांनी या चिन्हांचा वापर त्यांच्या बातम्यांमध्येही केला. फ्रेन्च ग्राफिक डिझायनर जीन ज्युलियन याच्या सुपिक डोक्यातून निघोली ही कल्पना होती. या हल्ल्य़ाविषयी त्याच्या मनावर जो परिणाम झाला, त्याला त्याने दृश्यरुप दिले होते.ज्युलियन हा सुट्या घालविण्यासाठी निघाला होता आणि अचानक पॅॅरिसवर हल्ला झाल्याचे वृत्त धडकले.