'जान्हवी' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 07:08 PM2019-04-17T19:08:15+5:302019-04-17T19:08:31+5:30

'जान्हवी अ लव स्टोरी' सामान्य माणसाच्या मनातला हळवा कोपरा असलेली प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'Jhanhavi' movie Muhurt | 'जान्हवी' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

'जान्हवी' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

googlenewsNext


'जान्हवी अ लव स्टोरी' सामान्य माणसाच्या मनातला हळवा कोपरा असलेली प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त अंधेरी येथे कामगार नेते व संपादक अभिजीत राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निर्माते विजय सावंत, चित्रपटाचे निर्माते कृष्णा गुप्ता, दिग्दर्शक रमेश सुर्वे, चंचल गुप्ता, अभिनेता अभिनव पाटेकर, अभिनेत्री रूपाली जाधव, ज्योति निवडुंगे, पद्मिनी हळदणकर, शुभांगिनी पाटील, हरेश पाटील, जयवंत पाटेकर, अर्चना होगाड, संगीतकार एच. डी. प्रमोद, कॅमेरामन सत्तारभाई, लेखक समीर राणे, लीलावती जयस्वाल, मनोज जयस्वाल, एस. आर, भारती, निर्माते विजयकुमार आदि बरीच राजकीय व चित्रपट क्षेत्रातील निर्माते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
विजय आनंद, देव आनंद यांच्या नवकेतन इंटरनॅशनलमध्ये कलादिग्दर्शक म्हणून आपल्या करियरला सुरूवात केलेल्या रमेशजींनी हिन्दी, मराठी, गुजराती तसेच बर्‍याच इतर भाषिक चित्रपटात कलादिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या आपल्या अनुभवाच्या जोरावर पाच ते सहा चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 
निर्माते कृष्णा गुप्ता यांची विरारमध्ये एस. एल, आर्ट्स ही म्युझिक, सिंगिग आणि डान्स अकादमी आहे. ते परप्रांतीय असून मराठी भाषेवर प्रेम आहे. त्यांनी काही मराठी, भोजपुरी अल्बम केले आहेत. काही शॉर्ट फिल्म केल्या आहेत. 
जान्हवीचा विषय आवडला आणि मराठी चित्रपटाची पहिली निर्मिती करीत आहे, असे कृष्णा गुप्ता यांनी सांगितले.
जान्हवी a love story ची कथा समीर राणे व लीलावती जयस्वाल यांची असून अर्चना होगड यांनी पटकथा संवाद लिहिले आहेत. जान्हवीची चार गीते संगीतकार एच. डी. प्रमोद यांनी लिहिली आहेत. काही कलाकार व तत्रंज्ञाची निवड झाल्यावर लवकरच 
पालघर, विरार येथे शूटिंग सुरू होणार आहे.

Web Title: 'Jhanhavi' movie Muhurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.