झाशीची राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 06:19 PM2018-07-27T18:19:33+5:302018-07-27T18:21:49+5:30

'स्वोर्डस अँँड स्केपट्रेस' हा हॉलिवूड सिनेमा जरी असला, तरी या सिनेमाचा विषय भारतातल्या ऐतिहासिक घटनेवर आधारित असल्यामुळे, या सिनेमाच्या पोस्टरवर भारतीय संस्कृतीचा मुलामा चढलेला आपल्याला दिसून येतो.

Jhansi's Queen Laxmibai to be seen in Hollywood |  झाशीची राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात 

 झाशीची राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात 

googlenewsNext
ठळक मुद्देस्वाती भिसे यांनी केले 'स्वोर्डस अँँड स्केपट्रेस' या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन 'स्वोर्डस अँँड स्केपट्रेस'मध्ये इंग्रजी भाषेसह मराठी व हिंदी भाषेचाही वापर

 झाशीची राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात 

ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील १८५७ च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव विख्यात आहे. 'झाशीची राणी' अशी ओळख असणाऱ्या या रणरागिणीच्या जीवनचरित्रावर 'स्वोर्डस अँँड स्केपट्रेस' नावाचा आंतरराष्ट्रीय सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरल्या गेलेल्या या ज्वलंत घटनेची दखल या सिनेमाद्वारे जागतिक पातळीवर घेतली जाणार आहे.  


भारतीय कलाशास्त्रज्ञ, प्रोफेसर, आणि भरतनाट्यम विशारद असलेल्या स्वाती भिसे यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसेने यात राणी लक्ष्मीबाईची प्रमुख भूमिका साकारली असून या चित्रपटात अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले, सिया पाटील आणि पल्लवी पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. राणी लक्ष्मीबाईची यशोगाथा जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लवकरच पोहोचवणाऱ्या या सिनेमाचा नुकताच तडफदार पोस्टर लाँँच करण्यात आला. 

'स्वोर्डस अँँड स्केपट्रेस' हा हॉलिवूड सिनेमा जरी असला, तरी या सिनेमाचा विषय भारतातल्या ऐतिहासिक घटनेवर आधारित असल्यामुळे, या सिनेमाच्या पोस्टरवर भारतीय संस्कृतीचा मुलामा चढलेला आपल्याला दिसून येतो. हा सिनेमा इंग्रजी भाषेमध्ये जरी असला तरी यात थोड्याफार प्रमाणात मराठी आणि हिंदी भाषेचादेखील वापर करण्यात आला आहे.  
याबद्दल दिग्दर्शिका स्वाती भिसे  म्हणाल्या की, 'राणी लक्ष्मीबाईचे जीवनचरित्र स्फुरण देणारे आहे. आजच्या स्त्रियांना तिची शौर्यगाथा आणि तिने केलेला संघर्ष प्रेरणादायी ठरणारे आहे. कोणत्याही पुरुष पाठबळाशिवाय मुठभर सैनिकांना घेऊन बलाढ्य इंग्रजी सैन्यावर चालून गेलेली ही महिला, जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा माझा मानस होता. त्यासाठी सर्वप्रथम, तिची शौर्यगाथा नाट्यसंगीतातून मांडण्याच्या मी विचारात होते. पण, या ज्वलंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची गाथा जगातल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांपर्यत पोहोचवण्यासाठी चित्रपटाचा मोठा पडदा महत्वाची भूमिका बजावेल, याची जाणीव मला झाली. आणि त्यामुळेच हा सिनेमा बनवण्याचा मी विचार केला.'
 

Web Title: Jhansi's Queen Laxmibai to be seen in Hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.