'झिम्मा २'ची परदेशातही हवा, सिनेमातील गाण्यावर लंडनमध्ये थिरकल्या 'मराठी पोरी'; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 15:17 IST2023-11-20T15:17:02+5:302023-11-20T15:17:58+5:30
लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय मुलींनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. 'झिम्मा २' मधील या गाण्यावर लंडनमध्ये तरुणींनी डान्स केला आहे.

'झिम्मा २'ची परदेशातही हवा, सिनेमातील गाण्यावर लंडनमध्ये थिरकल्या 'मराठी पोरी'; व्हिडिओ व्हायरल
बहुचर्चित 'झिम्मा २' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' या चित्रपटाचा हा रिमेक आहे. 'झिम्मा' नंतर 'झिम्मा २'साठी प्रेक्षक आतुर होते. अखेर हा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे. हेमंग ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २'ची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील मराठी पोरी हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. या गाण्यावरील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
परदेशातही 'झिम्मा २'मधील मराठी पोरी गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय मुलींनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. 'झिम्मा २' मधील या गाण्यावर लंडनमध्ये तरुणींनी डान्स केला आहे. या व्हिडिओत तरुणी पारंपरिक वेशात मराठी पोरी गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेमंत ढोमेने हा व्हिडिओ शेअर करत "लंडनमधील मराठी पोरी" असं म्हटलं होतं. तर क्षिती जोगने या व्हिडिओवर कमेंट केली आहे. "मस्त" अशी कमेंट क्षितीने या व्हिडिओवर केली आहे.
येत्या २४ नोव्हेंबरला 'झिम्मा २' चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.