Jio Filmfare Awards (Marathi) 2018 : सोनाली कुलकर्णी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अमेय वाघ सर्वोत्कृष्ट अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 11:58 PM2018-09-27T23:58:44+5:302018-09-28T00:03:01+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (मराठी)२०१८ चा सोहळा आज रंगला. यावेळी कच्चा लिंबू या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.
मनोरंजन विश्वातील कलाकालांचे कौतुक करण्यासाठी दरवर्षी विविध पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. असाच एक सोहळा म्हणजे, फिल्मफेअर पुरस्कार. मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (मराठी)२०१८ चा सोहळा आज रंगला. यावेळी या कच्चा लिंबू चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. मुरांबा या चित्रपटासाठी अमेय वाघ याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले तर कच्चा लिंबू या चित्रपटासाठी सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर नाव कोरले.
हृदयनाथ मंगेशकर यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज रंगलेल्या या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर हिची या सोहळ्याची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. अमेय वाघ आणि सुरवत जोशी यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने सोहळ्याची लज्जत वाढवली.
पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट : कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रसाद ओक- कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमेय वाघ - मुरांबा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : गिरीश कुलकर्णी- फास्टर फेणे
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: चिन्मयी सुमीत-मुरांबा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक) - इरावती हर्षे- कासव
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक) - शशांक शेंडे- रिंगण
सर्वोत्कृष्ट चित्रपट(क्रिटिक)- शिवाजी लोटण पाटील- हलाल
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : वरूण नार्वेकर- मुरांबा, मकरंद माने-रिंगण
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता : अभिनय बर्डे- ती सध्या काय करते
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री : मिथिला पालकर- मुरांबा
सर्वोत्कृष्ट गायिका : अनुराधा कुबेर- माझे तुझे (मुरांबा)
सर्वोत्कृष्ट गायक : आदर्श शिंदे -
विठ्ठला(रिंगण)
सर्वोत्कृष्ट गीतकार: संदीप खरे- माझे आई बाबा (कच्चा लिंबू)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : साहिल जोशी- रिंगण
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : अमलेन्द्रू चौधरी -हंपी
सर्वोत्कृष्ट संवाद : वरूण नार्वेकर- मुरांबा
सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्ले : क्षितीज पटवर्धन-फास्टर फेणे
सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन : निखील कोवळे- फास्टर फेणे
सर्वोत्कृष्ट कथा : मकरंद मान- रिंगण
सर्वोत्कृष्ट नृत्य : फुलवा खामकर- अपने ही रंग में(हंपी)