जितेंद्र जोशीच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण, फोटो शेअर करत म्हणाला - "वाईट ते चांगल्या प्रवासात..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 05:27 PM2023-09-01T17:27:40+5:302023-09-01T17:28:24+5:30
Jitendra Joshi And Mitali Joshi : जितेंद्र जोशी आणि मिताली जोशी यांच्या लग्नाला १४ वर्षे झाली असून त्यानिमित्ताने अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाने अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi)ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. जितेंद्र जोशी प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देतो. जितेंद्र जोशी आणि मिताली जोशी यांच्या लग्नाला १४ वर्षे झाली असून त्यानिमित्ताने अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जितेंद्र जोशीने पत्नी मिताली सोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, खरंच??? १,२२, ६४० तास??? ५११० दिवस??? १४ वर्षे?? आमचं नातं एक वर्षही टिकणार नाही, असे बरेचजण बोलले होते. मला त्या लोकांसाठी खूप वाईट वाटतं. तुम्ही, किंवा मी किंवा इतर लोक हे ठरवू शकत नाही. हे नातं स्वर्गातूनच बनून येतं. एक माणूस म्हणून आपण सतत बदलत असतो पण आपला आत्मा तोच राहतो. कधी ना कधी आपण समोरच्याकडून अपेक्षा करतो किंवा आपण समोरच्याच्या खूप दूर जातो किंवा जवळ येतो की एकमेकांना आपण समजू शकत नाही. ही नात्यातली वेगळीच उर्जा असते जी नात्याला बांधून ठेवत असते.
तो पुढे म्हणाला की, मला एक चांगला माणूस बनवणं हा एकमेव उद्देश आपल्या भेटीमागे असेल. अजून चांगला माणूस बनण्यासाठी अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. कडू ते चांगल्या प्रवासात साथ दिल्याबद्दल धन्यवाद. मी तुझा ऋणी आहे. धन्यवाद मिताली.. तुला अधिक यश आणि आनंद मिळो. १४व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!