जितेंद्र जोशीने पत्नीला हटके अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 06:02 PM2021-12-14T18:02:36+5:302021-12-14T18:03:34+5:30

Jitendra Joshi: जितेंद्र जोशीने इंस्टाग्रामवर पत्नीचा फोटो शेअर करत हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Jitendra Joshi wishes to his wife on her birthday; Wife has a relationship with Cineindustry | जितेंद्र जोशीने पत्नीला हटके अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जितेंद्र जोशीने पत्नीला हटके अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

googlenewsNext

चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाने अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi)ने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. दमदार अभिनेता अशी त्याची सिनेइंडस्ट्रीत ओळख निर्माण झाली आहे. दुनियादारीमधील साई असो किंवा मग तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांची आव्हानात्मक भूमिका, प्रत्येक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहजसुंदर अभिनयाने न्याय देतो. जितेंद्र जोशीने इंस्टाग्रामवर पत्नीचा फोटो शेअर करत हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

जितेंद्र जोशीने इंस्टाग्रामवर पत्नी मिताली जोशीचा फोटो शेअर करत लिहिले की, एक सुतार पक्षी असतो. तो फक्त चोच घेऊन सावकाशपणे भल्या मोठ्या झाडाला खिंडार पाडू शकतो कारण त्याच्या इवल्याशा चोची सोबत सातत्य, सराव आणि प्रयत्न ही तीन आयुधं त्याच्या सोबत असतात. आमच्या सुतार पक्ष्याला तर कविता सुद्धा समजते आणि करता देखील येते. आमचा सुतारपक्षी कलाकार आहे , रसिक आहे , बडबड्या आहे, उपद्व्यापी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजन्म विद्यार्थी आहे. एक दिवस तो खिंडार पाडेल आणि ते नक्षीदारच असेल यात मला शंका नाही म्हणूनच मी त्या दिवसाची वाट पाहतोय . ता. क. आज आमच्या सुतारपक्ष्याचा वाढदिवस असतो. "चोच सलामत तो खिंडार पचास". हॅप्पी बर्थडे मिताली.


अभिनेता जितेंद्र जोशीच्या पत्नीचे नाव मिताली जोशी असून ती चित्रपट व नाटकांचे लेखन करते आणि तिने नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. मिताली आणि जितेंद्र यांना एक मुलगी आहे जिचे नाव रेवा आहे.

Web Title: Jitendra Joshi wishes to his wife on her birthday; Wife has a relationship with Cineindustry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.