Ved Marathi Movie : रितेश जिनिलियासाठी काजोलची खास पोस्ट; सुख कळले गाण्याने लावले 'वेड'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:36 PM2022-12-27T17:36:05+5:302022-12-27T17:36:39+5:30

‘वेड’ चित्रपटातील आणखी एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. 'सुख कळले' असे या गाण्याचे बोल आहेत.

kajol-shared-ved-movie-song-praises-riteish-deshmukh-genelia-for-their-upcoming-marathi-film | Ved Marathi Movie : रितेश जिनिलियासाठी काजोलची खास पोस्ट; सुख कळले गाण्याने लावले 'वेड'

Ved Marathi Movie : रितेश जिनिलियासाठी काजोलची खास पोस्ट; सुख कळले गाण्याने लावले 'वेड'

googlenewsNext

Ved Marathi Movie : सध्या रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख या जोडीने सर्वांना वेड लावले आहे. ‘वेड’ या मराठी चित्रपटातून दोघेही चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. यातून रितेश पहिल्यादांच दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे आणि पहिलाच चित्रपट त्याने मराठीत काढला आहे. चित्रपट, त्यातील गाणी सगळ्याच गोष्टींचे कौतुक होताना दिसतेय. बॉलिवुड अभिनेत्री काजोलनेही 'वेड'च्या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत रितेश जिनिलियाचे कौतुक केले आहे.

‘वेड’ चित्रपटातील आणखी एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. 'सुख कळले' असे या गाण्याचे बोल आहेत. अजय अतुलने सिनेमाला उत्तम संगीत दिले आहे जे रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. 'सुख कळले' गाण्यात रितेश जिनिलियाची केमिस्ट्री बघायला मिळत आहे. 'नि:स्वार्थ प्रेमापेक्षा मोठं वेड काय असू शकतं असं कॅप्शन काजोलने दिलं आहे.'

Ved Lavlay Marathi song : वेड लावलंय...! भाईजान अन् रितेश भाऊचा स्वॅग अन् धम्माल डान्स, ‘वेड’चं तिसरं गाणं रिलीज

'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी रितेश आणि जिनिलिया जोरदार प्रमोशन करत आहेत. तसेच या सिनेमात अभिनेत्री जिया शंकर ही देखील आहे. वेड तुझा गाण्यातील रितेश आणि तिच्या रोमान्सने सर्वांनाच भुरळ घातली आहे. 

Web Title: kajol-shared-ved-movie-song-praises-riteish-deshmukh-genelia-for-their-upcoming-marathi-film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.