'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आता दिसतेय अशी!, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 07:00 AM2021-12-23T07:00:00+5:302021-12-23T07:00:00+5:30

१९९१ साली 'आयत्या घरात घरोबा' (Aayatya Gharat Gharoba) चित्रपट रिलीज झाला होता आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.

Kanan from the movie 'Ayatya Gharat Gharoba' looks like this now !, find out about her | 'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आता दिसतेय अशी!, जाणून घ्या तिच्याबद्दल

'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आता दिसतेय अशी!, जाणून घ्या तिच्याबद्दल

googlenewsNext

नव्वदच्या दशकात 'आयत्या घरात घरोबा' (Aayatya Gharat Gharoba) चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, किशोरी शहाणे तसेच राजेश्वरी सचदेव हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील कानन आठवतेय ना. काननची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी सचदेव (Rajeshwari Sachdev)ने निभावली होती. फार कमी जणांना माहित आहे की, राजेश्वरी सचदेवचा नवरा देखील अभिनेता आहे.

आयत्या घरात घरोबा चित्रपटात राजेश्वरी सचदेवने कानन म्हणजेच सचिन पिळगावकर यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. जी नंतर लक्ष्मिकांत बेर्डे यांच्या प्रेमात पडते. राजेश्वरी ही थिएटर आर्टिस्ट, गायिका तसेच नृत्यांगना आहे. आयत्या घरात घरोबा हा तिचा पहिला मराठी चित्रपट. या चित्रपटानंतर श्याम बेनेगल यांनी ‘सुरज का सांतवा घोडा’ चित्रपटात तिला काम दिले.


राजेश्वरी सचदेव सरदारी बेगम, हरी भरी, द फरगॉटन हिरो, वेलकम तू सज्जनपूर या हिंदी चित्रपटात झळकली. ती एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे. अनेक हिंदी कार्यक्रमात तिने संचालन केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की राजेश्वरी सचदेव हिने अभिनेता वरुण वडोलासोबत विवाह केला. वरुण वडोला हा हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आहे. 

ये है मुंबई मेरी जान, कोशिश एक आशा, सोनी महिवाल, अस्तित्व एक प्रेम कहाणी अशा अनेक दर्जेदार मालिकेतून कधी विनोदी भूमिका तर कधी गंभीर भूमिका त्याने केल्या आहेत.

Web Title: Kanan from the movie 'Ayatya Gharat Gharoba' looks like this now !, find out about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.