वयाच्या २२ व्या वर्षी प्रसिद्ध मराठी गायकाने खरेदी केली मर्सिडीज; वडिलांना दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 01:04 PM2022-07-25T13:04:10+5:302022-07-25T13:04:47+5:30

Kaustubh gaikwad: कार्तिकीने मर्सिडीज कारच्या शोरुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या वडिलांची रिअॅक्शन दाखवण्याचा प्रयत्न तिने केला आहे.

kartiki gaikwad brother kaustubh gaikwad gifted mercedes car to father kalyanji gaikwad | वयाच्या २२ व्या वर्षी प्रसिद्ध मराठी गायकाने खरेदी केली मर्सिडीज; वडिलांना दिली भेट

वयाच्या २२ व्या वर्षी प्रसिद्ध मराठी गायकाने खरेदी केली मर्सिडीज; वडिलांना दिली भेट

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील सारेगमप लिटील चॅम्प या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे कार्तिकी गायकवाड (kartiki gaikwad). आज मराठी कलाविश्वात कार्तिकीने तिच्या आवाजाच्या जोरावर हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. कार्तिकी सोशल मीडियावर सक्रीय असून बरेचदा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने तिच्या भावाचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

कार्तिकीप्रमाणेच तिचा भाऊ कौस्तुभ गायकवाडदेखील (kaustubh gaikwad) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. कौस्तुभवने काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी कौस्तुभने मर्सिडीज कार खरेदी केली असून ही गाडी त्याच्या वडिलांना म्हणजेच कल्याणजी गायकवाड यांना भेट केली आहे.

"वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी माझ्या कौस्तुभ दादाने बाबांना Mercedes भेट दिली. congratulations to you", असं कॅप्शन देत कार्तिकीने तिच्या भावाचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. 

दरम्यान, कार्तिकीने मर्सिडीज कारच्या शोरुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या वडिलांची रिअॅक्शन दाखवण्याचा प्रयत्न तिने केला आहे. कौस्तुभने अनेक चित्रपटांसाठी गाण गायलं आहे. तसंच निवडणूक प्रचारासाठीही त्याने गाणी तयार केली आहेत. कौस्तुक उत्तम गायक असण्यासोबतच गीतकार, संगीतकारही आहे.
 

Web Title: kartiki gaikwad brother kaustubh gaikwad gifted mercedes car to father kalyanji gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.