​केदार शिंदे करणार गुजराती नाटकाचे दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 09:25 AM2017-07-31T09:25:05+5:302017-07-31T14:55:05+5:30

केदार शिंदे यांनी अगं बाई अरेच्चा, श्रीमंत दामोदरपंत, यंदा कर्तव्य आहे, जत्रा यांसारखे अनेक चांगले चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले ...

Kedar Shinde directed the Gujarati play | ​केदार शिंदे करणार गुजराती नाटकाचे दिग्दर्शन

​केदार शिंदे करणार गुजराती नाटकाचे दिग्दर्शन

googlenewsNext
दार शिंदे यांनी अगं बाई अरेच्चा, श्रीमंत दामोदरपंत, यंदा कर्तव्य आहे, जत्रा यांसारखे अनेक चांगले चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांप्रमाणे मराठी मालिकांचे देखील दिग्दर्शन केले आहे. मधु इथे आणि चंद्र तिथे, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय यांसारख्या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. मराठी रंगभूमीला देखील त्यांनी लोचा झाला रे, श्रीमंत दामोदर पंत, गेला उडत, तू तू मी मी, सही रे सही यांसारखी दर्जेदार नाटकं दिली आहेत. मराठीतील एक प्रतिभाशाली दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी तो बात पक्की या हिंदी चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले होते आणि आता ते गुजराती रंगभूमीकडे वळले आहेत.
केदार शिंदे लवकरच नाटक ना नाटक नु नाटक या गुजराती नाटकाचे दिग्दर्शन करणार आहेत. द प्ले दॅट गोज राँग या अमेरिकन नाटकावर आधारित हे नाटक आहे. द प्ले दॅट गोज राँग हे नाटक पाश्चिमात्य देशात अतिशय लोकप्रिय असून या नाटकाने अनेक पारितोषिकं देखील मिळवली आहेत. नाटक ना नाटक नु नाटक हे नाटक नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून सध्या या नाटकाच्या तालमी सुरू आहेत. विशेष म्हणजे या नाटकाची निर्मिती प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशी करणार आहे. शर्मनने चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच अनेक नाटकात देखील भूमिका साकारल्या आहेत. त्याचे मैं और तुम हे नाटक सध्या चांगलंच गाजत आहे. तसेच ऑल द बेस्ट या प्रसिद्ध मराठी नाटकाच्या गुजराती व्हर्जनमध्ये देखील तो काम करत आहे. 

Also Read : ​​केदार शिंदे दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट 'रायबाचा धडाका'

Web Title: Kedar Shinde directed the Gujarati play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.