"एक कहानी खतम तो दुजी...", 'बाईपण भारी देवा'च्या यशानंतर केदार शिंदेंच्या नवीन प्रोजेक्टची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 03:38 PM2023-08-01T15:38:52+5:302023-08-01T15:39:53+5:30

'बाईपण भारी देवा'नंतर केदार शिंदेंच्या नव्या प्रोजेक्टबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

kedar shinde new project after success of marathi movie baipan bhari deva post viral | "एक कहानी खतम तो दुजी...", 'बाईपण भारी देवा'च्या यशानंतर केदार शिंदेंच्या नवीन प्रोजेक्टची चर्चा

"एक कहानी खतम तो दुजी...", 'बाईपण भारी देवा'च्या यशानंतर केदार शिंदेंच्या नवीन प्रोजेक्टची चर्चा

'बाईपण भारी देवा' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सिनेमांना टक्कर देत या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरुच आहे. ३० दिवसांत 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने ७० कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटाला मिळणारा उत्फुर्त प्रतिसाद पाहून दिग्दर्शक केदार शिंदेही भारावून गेले आहेत. बाईपण भारी देवा नंतर केदार शिंदे लवकरच काहीतरी नवीन कल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

'बाईपण भारी देवा' चित्रपटानंतर केदार शिंदे नवीन प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली आहे. मराठी लेखक, दिग्दर्शक ओमकार दत्त यांनी केदार शिंदेबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या लेखिका वैशाली नाईकही दिसत आहेत. एका हॉटेलमधील हा फोटो असल्याचं दिसत आहे. या फोटोला ओमकार दत्त यांनी "एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू...बाईपण भारी देवानंतर काहीतरी भारी", असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमुळे केदार शिंदे आता नवीन काय घेऊन येणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

धर्मेंद आणि शबाना आझमी यांच्या लिपलॉक सीनवर करण जोहरचं भाष्य, म्हणाला, "मी त्यांना..."

या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरनेही या पोस्टवर कमेंट करत "प्रतीक्षा करत आहे" असं म्हटलं आहे. 'बाईपण भारी देवा'मधील अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही या पोस्टवर कमेंट केली आहे. त्यामुळे आता केदार शिंदेंच्या नवीन प्रोजेक्टसाठी चाहते आतुर आहेत. 

"अमृता तू खास आहेस", रणवीर सिंहच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष, अमृता खानविलकरही भारावली

'बाईपण भारी देवा' हा चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून दाखवलेल्या सहा बहिणींच्या अनोख्या गोष्टीने प्रेक्षकांच्या मनात घऱ केलं. विशेषत: महिला वर्गाच्या हा चित्रपट जास्त पसंतीस उतरल्याचं चित्र आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टांगडी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 

Web Title: kedar shinde new project after success of marathi movie baipan bhari deva post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.