केतकी माटेगावकरने चुलत भावाच्या आत्महत्येनंतर लिहिली भावूक पोस्ट, म्हणाली-किती आठवणी..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 11:09 AM2022-07-28T11:09:58+5:302022-07-28T11:13:43+5:30

Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरचं कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही. भावाच्या निधनानंतर १५ दिवसांनी केतकीने भावाच्या आठवणीत सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे.

Ketaki Mategaonkar wrote an emotional post after the suicide of his cousin Akshay Mategaonkar | केतकी माटेगावकरने चुलत भावाच्या आत्महत्येनंतर लिहिली भावूक पोस्ट, म्हणाली-किती आठवणी..

केतकी माटेगावकरने चुलत भावाच्या आत्महत्येनंतर लिहिली भावूक पोस्ट, म्हणाली-किती आठवणी..

googlenewsNext

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर(Ketaki Mategaonkar)च्या चुलत भावाने आत्महत्या केली होती. केतकीचा चुलत भाऊ अक्षय अमोल माटेगावकर याने पुण्यात हिंजवडी येथे आठव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. या धक्क्यातून माटेगावकर कुटुंब अजूनही सावरले नाही आहे. १५ जुलैला ही दुर्घटना घडली. भावाच्या निधनानंतर १५ दिवसांनी केतकीने भावाच्या आठवणीत सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. 

केतकी लिहिते,  'माझा अक्षु माझा छोटासा गोड अक्षु, तुझ्या सारखा अत्यंत सुस्वभावी, समंजस, मल्टी टॅलेंटेड, प्रचंड हुशार, मेहनती आणि गोड भाऊ मला मिळाला. आता काय लिहू, लिहू की नको लिहू, 21 वर्षांच्या आठवणी काही शब्दात कशा लिहू? हाच विचार करतेय. गेल्या काही दिवसांपासून तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न करून माझा दिवस सुरु करतेय. ते क्षण धुसर होता कामा नये. किती आणि केवढ्या आठवणी..

'अभ्यास झाला की सगळं बाजूला ठेऊन रियाझला बसुन त्यात हरवून जाणारा अक्षु, गझल ठुमरी ऐकत बसणारा, कधी हरिहरन तर कढी पिंक फ्लॉइड ऐकणारा. कधी भारतीय शास्त्रीय संगीत तर कधी फुटबॉल मधलं ज्ञान असलेला, घरी आल्यावर तू मी अमोल चाचा बसलो की जॅमिंग करणारा माझा अक्षु मला सोडुन गेला.'

पुढे ती म्हणते, अक्षु तुझा समजुरदारपणा, तुझी बुद्धिमत्ता अतुलनीय होती. तरी एक गोष्ट तुझी केतकी ताई म्हणून - आयुष्यात कुठली ही गोष्ट, ध्येय, स्वप्न, विचार आपल्या स्वतापेक्षा मोठे नसतात. ते होऊ द्यायचे नसतात. आपण आहोत म्हणून त्यांचं अस्तित्व असतं. तू आम्हांला सोडुन गेलास पण आयुष्यभर एक गोष्ट तू आमच्या सोबत आहेस ह्याची जाणीव करुन देत राहिल.. ते म्हणजे तुझं गाणं! तुझं अप्रतिम गाणं. तुझं घरी आले की गोड हसून मिठी मारणं, कधीही तुझ्या मांडीवार डोकं ठेवलं आणि चित्रपट किंवा मॅच चालु असेल तरी तुझं प्रेमाने डोक्यावरुन हात फिरवणं मिस करतेय मी. असं वाटतं की आत्ता आले घरी की अमोल चाचा हार्मोनियम घेईल, तू तानपुरा लवशील आणि आपण गायला बसू. सगळं पूर्ववत.. रोज सकळी उठले की क्षणभर असं वाटून जात आणि मग लगेच परिस्थिती मला वास्तवाचं भान करुन देते.'

''तुझा लहानपणीचा “रूठ के हमसे कभी” ते एक अप्रतिम ख्याल गायकी ! हा प्रवास मी पाहिलाय खुप खुप जवळून.. माझा लहान भाऊ एक अप्रतिम कलाकार होता, याचा मला कायम अभिमान वाटत राहील. मी हे वाक्य तुझ्यासाठी लिहेन असं वाटलं नव्हतं कधी पण.. तू जिथे कुठे असशील, अशी कल्पना करतेय की तू गात असशील, आनंदी असशील, तू कायम आमच्या मिठीत, आमच्यासोबत राहशील. आपण 5जण कायम एकत्र असू. तू, आकांक्षा अम्मू, चाय आणि मी. माझे प्रेम कायम तुझ्यासोबत राहील. मिस यू अक्षु. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. -केतकीताई.'' अशा शब्दात केतकीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 
 

Web Title: Ketaki Mategaonkar wrote an emotional post after the suicide of his cousin Akshay Mategaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.