केतकी माटेगावकरचं घायाळ करणारं सौंदर्य, सोशल मीडियावर चर्चा तिच्या नवीन लूकची
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 15:00 IST2021-09-15T14:56:03+5:302021-09-15T15:00:32+5:30
ज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय. टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.

केतकी माटेगावकरचं घायाळ करणारं सौंदर्य, सोशल मीडियावर चर्चा तिच्या नवीन लूकची
केतकी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. यासोशल मीडियावर केतकी माटेगावकरने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. तिचा हा ग्लॅमरल लूक पाहून चाहत्यांच्याही नजरा हटत नाहीय. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. केतकीचा लूक साऱ्यांनाच भावतो आहे. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे केतकीचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय. टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिका ही आहे. निरागस चेहरा लाभलेली अभिनेत्री आणि गोड गळ्याची गायिका म्हणून केतकी माटेगावकर प्रसिद्ध आहे.
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे केतकीचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.