चिमुरड्या केतकी माटेगावकरचे छडी लागे छमछम हे गाणे ऐकले का? जुना व्हिडिओ होतोय व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 15:55 IST2021-04-23T15:51:36+5:302021-04-23T15:55:40+5:30
या व्हिडिओत चिमुकली केतकी माटेगावकर छडी लागे छम छम हे गाणे गाताना दिसत आहे.

चिमुरड्या केतकी माटेगावकरचे छडी लागे छमछम हे गाणे ऐकले का? जुना व्हिडिओ होतोय व्हायरल
गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. केतकीच्या आवाजावर आणि तिच्या अभिनयावर रसिका फिदा आहेत. तिने नुकताच तिच्या लहानपणीचा एक व्हिडिओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत चिमुकली केतकी माटेगावकर छडी लागे छम छम हे गाणे गाताना दिसत आहे. तिचे हे गाणे तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केतकीचा आवाज तर छान आहे. पण त्याचसोबत ती गोड दिसतेय असे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगत आहेत.
टाईमपासमधील प्राजूच्या भूमिकेमुळे केतकी घराघरात पोहोचली. काकस्पर्श, तानी या सिनेमात देखील केतकी माटेगावकर झळकली आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे.