केतकी माटेगावकरने हॉट अँड बोल्ड फोटो शेअर करत केलं सर्वांना क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 07:00 IST2021-01-22T07:00:00+5:302021-01-22T07:00:02+5:30
या फोटोशूटमध्ये केतकीला ओळखणंही कठीण झालं आहे.

केतकी माटेगावकरने हॉट अँड बोल्ड फोटो शेअर करत केलं सर्वांना क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल
गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोशूटमध्ये केतकीला ओळखणंही कठीण झालं आहे.
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. केतकीच्या चाहत्यांना तिचा हा ही अंदाज भावला आहे. तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील.
केतकीने तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केले असल्याचे पाहायला मिळतंय. करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. टाईमपास', 'काकस्पर्श', 'तानी' या सिनेमात केतकी माटेगावकर झळकली आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय.