'ख्वाडा' महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:18 AM2016-01-16T01:18:51+5:302016-02-07T05:27:37+5:30

धनगर समाजाने पिढय़ान्पिढय़ा जपलेली संस्कृ ती दर्शविण्याचा उद्देश या सिनेमातून केला असल्याचे सांगून भाऊराव म्हणाले, ''धनगर समाजाची आगळीवेगळी परंपरा ...

'Khwada' is to reach the people of Maharashtra | 'ख्वाडा' महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे

'ख्वाडा' महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे

googlenewsNext
गर समाजाने पिढय़ान्पिढय़ा जपलेली संस्कृ ती दर्शविण्याचा उद्देश या सिनेमातून केला असल्याचे सांगून भाऊराव म्हणाले, ''धनगर समाजाची आगळीवेगळी परंपरा त्यांनी जपली आहे. जेव्हा सिनेमाची कथा घेऊन निर्मात्यांकडे जात होतो त्या वेळी त्यांना कथा आवडायची; मात्र दिग्दर्शनासाठी ते नकार देत होते. मात्र अडचणींवर मात करीत हा सिनेमा आम्ही घडविला. एका दुष्काळाचा सिन शूट क रण्यासाठी तब्बल वर्षभर वाट पाहावी लागली. या काळात पात्रांच्या शरीरष्टीतही बदल झाला होता. तोदेखील सांभाळणे कठीणच होते. पैसे आले की तीन-चार दिवसांचे शेड्यूल आखायचे व शूटिंगला पळायचे असाच आमचा धंदा चालला. मात्र, या काळात सर्वांची मदत झाली. चंद्रशेखर मोरेपासून ते शंशाक शिंदेपर्यंत सर्वांची मदत झाली.'' टेल्सा नव्हे टेस्ला शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या 'फुल्ली इलेक्ट्रॉनिक्स टेल्सा' या बातमीत कार कंपनीचे नाव अनावधानाने टेल्सा छापून आले. मुळात ते 'टेस्ला' असे आहे.दृश्यात नाटकीयता नाही
तसा हा माझा पहिलाच सिनेमा आहे. मात्र हा सिनेमा करताना मला दिग्दर्शकाने जे स्वातंत्र्य दिले, त्यातून त्यांचा विश्‍वास व कल्पनाशीलता याचे दर्शन घडते.
- वीरधवल पाटील,
सिनेमॅटोग्राफर (डीओपी)
अनेक गोष्टी अनुभवता येतील
ग्रामीण जीवनावरचा सिनेमा, तेथील लोकांची समस्या, विशेषत: धनगर समाजातील संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा सिनेमा आहे.
- अमोल चौधरी, सहायक अभिनेता मराठी सिनेमा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवा
हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवायला हवा. महाराष्ट्रात आम्हाला शहरातील थिएटर्स मिळविण्यात अडचण आली नाही. मराठी सिनेमा टॅक्स फ्री आहेच; मात्र प्रत्येक मराठी सिनेमा ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे गरजेचे झाले आहे.
- भाऊ राव कर्‍हाडे, निर्माता दिग्दर्शक
 अन् रंगविला बाळू
नायक थोडा तालमीतला रांगडा गडी हवा होता. पेहलवानांनी तर आधीच नकार दिला. जिमवाल्यांची बॉडी भूमिकेला न्याय देणारी नव्हती. अचानक दिग्दर्शक म्हणाले, ''तू आपले वजन वाढविलेस तर ही भूमिका तूच करू शकतो.'' मी तालमीत वाढल्याने आवड होतीच, सिनेमाचा नादही होताच, मग काय, सारे ऑडिशन्स बंद करून एकाच महिन्यात वजन वाढविले. अन् रंगविला बाळू.
- भाऊसाहेब शिंदे, नायक
ग्रामीण जीवनशैली शिकण्याची संधी
लहानपणापासूनच तशी चित्रपटात काम करण्याची हौस होती. मी मुंबईत वाढले. ऑडिशनमध्ये निवड झालेला सिनेमा ग्रामीण भागावर आधारलेला असल्याने पहिला प्रश्न होता, तुला गावाकडच्या मुलीसारखं लाजता येतं क ा? थोडाफार प्रयत्न केला, तो यशस्वी झाला असेलच. नायिका म्हणून निवड झाल्यावर ग्रामीण जीवनशैली शिकण्याची संधी मला मिळाली.
- रसिका चव्हाण, नायिका 'ख्वाडा'च्या चमूच्या 'सीएनएक्स'शी दिलखुलास गप्पा
मराठी सिनेमाला लाभलेली जागृतीची व संस्कृतीची झालर आजही कायम असून, ती नेटाने समोर नेणारे निर्माते-दिग्दर्शक आपल्या कलाकृतीविषयी किती सजग असतात याचे उदाहरण 'ख्वाडा' या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर दिसेल. या ुसिनेमासाठी मला ठिकठिकाणी 'ख्वाडा' (अडचण) आला, चित्रपटाच्या निर्मितीसाठी विक लेली जमीन परत मिळविली, माझा सिनेमा महाराष्ट्रातील जनेतेपर्यंत पोहोचला तरच 'ख्वाडा'चे वर्तुळ पूर्ण होईल, असा विश्‍वास या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाळे यांनी 'सीएनएक्स'शी केलेल्या दिलखुलास गप्पांमधून व्यक्त केला. ख्वाडाची अनेक चित्रपट महोत्सवातून प्रशंसा केली जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीयस्तरावरील मिळालेल्या पुरस्काराने ख्वाडाला नवी ओळख मिळाली आहे. येत्या २२ ऑक्टोबरला महाराष्ट्रात सर्वत्र ख्वाडा प्रदर्शित होत आहे.

Web Title: 'Khwada' is to reach the people of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.