किरणने गायले मराठी गाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2017 12:05 PM2017-01-04T12:05:14+5:302017-01-04T13:12:45+5:30

आमिरने फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर समाजाप्रती कर्तव्य दाखवत नेहमीच समाजकार्यात तो अग्रेसर राहीला आहे. आमिरने जलसंवर्धनासाठी पुढे सरसावत ‘सत्यमेव जयते ...

Kiran has sung Marathi song | किरणने गायले मराठी गाणे

किरणने गायले मराठी गाणे

googlenewsNext
िरने फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर समाजाप्रती कर्तव्य दाखवत नेहमीच समाजकार्यात तो अग्रेसर राहीला आहे. आमिरने जलसंवर्धनासाठी पुढे सरसावत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ अभियान सुरु केले होते. या अभियानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी नुकताच एका कार्यक्रमात म्युझिक व्हिडिओ लाँच केला.
‘एकजुटीने पेटलं रान तुफान आलंया..’ असे बोल असणाऱ्या या गीताला अजय-अतुल या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केले असून स्वत: किरण रावने हे गीत गायले आहे. गुरु ठाकूरने हे गाणे लिहिले आहे. अजय गोगावले आणि किरण राव यांनी गायलेले हे गाणे अतिशय प्रत्ययकारीपणे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक यशस्वी प्रयत्न आहे असे म्हणायला हरकत नाही. 

गेल्या वर्षापासूनच आमिर आणि त्याची पत्नी किरण, महाराष्ट्र राज्य जलयुक्त शिबिराच्या निमित्ताने कार्यरत आहेत. या अभियानाअंतर्गत पाण्याच्या आणि अवर्षणाच्या अभावी दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवलेल्या गावांमध्ये पाण्याचा साठा आणि त्याचा योग्य तो वापर कसा करण्यात यावा यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या उपक्रमांअंतर्गत जनसामान्यांचा सहभाग वाढविण्यासाठी अनोखी शक्कल लढवत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.
२०१७ हे वर्ष या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून यात राज्यातील ३० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ‘सत्यमेव जयते वॉटर कप’च्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात येणाऱ्या या व्हिडिओबद्दल सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या व्हिडिओच्या निमित्ताने आमिरच्या पत्नीने म्हणजेच किरण रावने पहिल्यांदाच मराठीत गाणे गायले आहे.

Web Title: Kiran has sung Marathi song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.