"त्या सिनेमात संतोष गद्दार मावळ्याच्या भूमिकेत होता", किरण मानेंनी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 11:23 IST2025-03-11T11:23:15+5:302025-03-11T11:23:42+5:30

औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाकडे बघितलं नाही म्हणणाऱ्या संतोष जुवेकरची पोलखोल, किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

kiran mane shared ravrambha movie post after santosh juvekar statement on chhaava movie akshay khanna | "त्या सिनेमात संतोष गद्दार मावळ्याच्या भूमिकेत होता", किरण मानेंनी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

"त्या सिनेमात संतोष गद्दार मावळ्याच्या भूमिकेत होता", किरण मानेंनी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा संतोष जुवेकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संतोषने 'छावा' सिनेमात रायाजीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. संतोषने या सिनेमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या. एका मुलाखतीत संतोषने अक्षय खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाकडे मी बघितलंदेखील नव्हतं, असं संतोष म्हणाला होता. 

संतोषच्या या वक्तव्यानंतर आता किरण मानेंनी त्याची पोलखोल केली आहे. किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. संतोष जुवेकरसोबतचा ऐतिहासिक सिनेमातील एक फोटो किरण मानेंनी शेअर केला आहे. किरण माने आणि संतोष जुवेकरने रावरंभा या ऐतिहासिक सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमात संतोषने गद्दार मावळ्याची भूमिका साकारली होती. सिनेमातील हा फोटो शेअर करत किरण मानेंनी पोस्ट लिहिली आहे. 

"मी ‘रावरंभा’ नांवाच्या सिनेमात ‘हकीमचाचा’ ही छ.शिवरायांशी एकनिष्ठ असलेल्या मुस्लिम गुप्तहेराची भुमिका केली होती! त्या सिनेमामध्ये संतोष जुवेकर हा मुघल बादशहांना राजांच्या खबरी देणार्‍या गद्दार मावळ्याच्या भुमिकेत होता. त्या सिनेमात मी त्याला रंगेहाथ पकडतो तो क्षण! सहज एक आठवण…", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. किरण मानेंच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 


काय म्हणाला होता संतोष जुवेकर? 

"सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या त्या कोणाशीच मी बोललो नाही. संपूर्ण शूटिंगमध्ये मी तरी त्या कोणत्याही पात्राशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचं शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंही नाही. मी बघूच शकत नाही. माझा अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तम काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसं वाटलं नाही.मी त्यांचा द्वेष करत नाही. पण, मी सेटवर एक शब्दही त्यांच्याशी बोललो नाही".

Web Title: kiran mane shared ravrambha movie post after santosh juvekar statement on chhaava movie akshay khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.