​किर्ती गायकवाड-केळकर म्हणतेय सध्या तरी मराठी चित्रपटात काम करण्याचा विचार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2017 11:43 AM2017-03-03T11:43:20+5:302017-03-03T17:13:20+5:30

किर्ती गायकवाड-केळकरने सिंदूर तेरे नाम का, सात फेरे यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. पण अभिनेता शरद केळकरसोबत लग्न केल्यानंतर ...

Kirti-Gaikwad-Kelkar says there are no plans to work in a Marathi film right now | ​किर्ती गायकवाड-केळकर म्हणतेय सध्या तरी मराठी चित्रपटात काम करण्याचा विचार नाही

​किर्ती गायकवाड-केळकर म्हणतेय सध्या तरी मराठी चित्रपटात काम करण्याचा विचार नाही

googlenewsNext
र्ती गायकवाड-केळकरने सिंदूर तेरे नाम का, सात फेरे यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. पण अभिनेता शरद केळकरसोबत लग्न केल्यानंतर ती अभिनयापासून दूर गेली. संसार, मूल याच्यात ती चांगलीच रमली होती. पण आता सहा वर्षांनी ती कमबॅक करत आहे. ससूराल सिमर का या मालिकेत ती झळकणार असून ती या मालिकेत सिमर ही मुख्य भूमिका साकारणार आहे. या मालिकेत सिमर ही भूमिका पूर्वी दीपिका कक्कडने साकारली होती. 
किर्तीने हिंदी मालिकांमधून करियरला सुरुवात केली असली तरी ती मराठी असल्याने तिला मराठी चित्रपटांविषयी प्रचंड प्रेम आहे. तिचे पती शरद केळकरने तर लय भारी या मराठी चित्रपटात अभिनयदेखील केला होता. या चित्रपटात त्याने साकारलेला संग्राम हा खलनायक प्रचंड गाजला होता. किर्तीलादेखील गेल्या काही वर्षांपासून अनेक मराठी मालिकांच्या ऑफर्स येत आहेत. पण तिची मुलगी लहान असल्याने तिने त्या भूमिका स्वीकारल्या नव्हत्या. पण आता ती पुन्हा अभिनयाकडे वळली आहे. संसार आणि काम यांच्यात ताळमेळ घालण्याचे तिने आता ठरवले आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या चांगल्या संधी ती स्वीकारणार आहे. भविष्यात एखादी मराठी चित्रपटाची ऑफर आली आणि तिला पटकथा आवडली तर ती मराठी चित्रपटात नक्कीच झळकेल असे ती सांगते. पण त्याचसोबत सध्या तरी मराठी चित्रपट करण्याचा विचार नाहीये असे ती सांगते. कारण तिने सध्या पूर्ण लक्ष ससूराल सिमर का या मालिकेकडे देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या दरम्यान चित्रपटाच्या ऑफर्स आल्यास त्या स्वीकारायच्या नाहीत असे तिचे म्हणणे आहे. 

Web Title: Kirti-Gaikwad-Kelkar says there are no plans to work in a Marathi film right now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.