Exclusive चौर्यसाठी किशोर कदम यांनी घेतले नाही मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2016 08:04 AM2016-07-28T08:04:44+5:302016-07-28T13:34:44+5:30

प्रियांका लोंढे              बड्या कलाकारांना आपल्या चित्रपटात घेण्याचे स्वप्न तर प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाचे असते. कधी कधी ...

Kishor Kadam has not taken any exemption for the ex-gratia | Exclusive चौर्यसाठी किशोर कदम यांनी घेतले नाही मानधन

Exclusive चौर्यसाठी किशोर कदम यांनी घेतले नाही मानधन

googlenewsNext
प्रियांका लोंढे


             बड्या कलाकारांना आपल्या चित्रपटात घेण्याचे स्वप्न तर प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाचे असते. कधी कधी चित्रपटाची कथा लिहितानाच  काही पात्रांमध्ये लेखकाला आपले कलाकार दिसु लागतात. पण हेच कलाकार आपल्याला त्या कॅरेक्टर्ससाठी मिळतील याची काही शाश्वती नसते. कारणे बरीच असतात डेट्स, स्क्रीप्ट अन सर्वात महत्वाचे म्हणजे मानधन. नवोदित दिग्दशर््क किंवा लो बजेट सिनेमावाल्यांना या गोष्टीचा नक्कीच अनुभव आलेला असतो. जेवढे मोठे  कलाकाराचे स्टारडम तेवढे जास्त त्याचे मानधन. मग कथा चांगली असली तरी पुरेसे पैसे न मिळाल्याने चित्रपट सोडलेले अनेक मोठे स्टार्स आहेत. असाच प्रत्यय आलाय चौर्य सिनेमाचे दिग्दर्शक समीर पाटील यांना. यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मी या चित्रपटाच्या कथेवर गेली २ ते ३ वर्ष काम करीत आहे. कथा पुर्ण झाल्यानंतर मी  जवळपास ७० ते ८० कलाकारांना भेटलो.  अगदी बड्या स्टार्सला मी स्क्रीप्ट ऐकवली. सर्वांना कथा आवडायची परंतू प्रश्न यायचा मानधनाचा. केवळ पुरेसे मानधन न मिळाल्याने चौर्य मध्ये काम करण्यास सर्वांनीच नकार दिला. अशातच मला किशोर कदम यांनी उत्तम कथा असल्यामुळे या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. एवढेच नाही तर त्यांनी या सिनेमासाठी एक रुपयाही घेतला नाही. तर मिलिंद शिंदे यांनी देखील खुपच कमी पैशात हा चित्रपट केला आहे. आज इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पोझिशनवर असुन देखील या कलाकारंनी स्टारडमचा गर्व न करता या सिनेमात भुमिका साकारल्या आहेत. 
 
                   
  

Web Title: Kishor Kadam has not taken any exemption for the ex-gratia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.