Life After Marriage: दिपाली भोसले सैय्यद हे नाव लावलं तरी लोकांना त्रास, दिपाली सैय्यद लावलं तरी.......
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:40 AM2021-05-10T10:40:57+5:302021-05-10T10:51:19+5:30
मराठी कुटुंबात जन्माला आली असली तरी, लग्न तिने मराठी माणसासोबत न करता २००८ साली दिग्दर्शक बॉबी खान यांच्यासह लग्न करत आयुष्याला नवीन सुरुवात केली.
आपल्या डान्सच्या कौशल्यानं सा-यांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री दिपाली सैय्यद सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात ती असते. दिपाली सैय्यदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिपालीने लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा असतो याविषयी बोलताना दिसतेय.
NewJ ने घेतलेल्या मुलाखतीत दिपाली सैय्यद याविषयी बोलत होती. लग्नानंतर दिपाली भोसले दिपाली सैय्यद झाली. अनेकदा माझ्या आडनावामुळे लोकांना फार त्रास होतो. मग या पाठोपाठ माझे आई- वडिल माझे संस्कार याविषयी चर्चा सुरु होतात. पण मी या गोष्टीला फारसे महत्त्व देत नाही.
माझ्या नियमांनुसारच मी आजपर्यंत चालत आले आहे. मराठी कुटुंबात जन्माला आली असली तरी, लग्न तिने मराठी माणसासोबत न करता २००८ साली दिग्दर्शक बॉबी खान यांच्यासह लग्न करत आयुष्याला नवीन सुरुवात केली. लग्नानंतर तिचं नाव सोफिया जहांगीर सैय्यद असे ठेवण्यात आलं. लग्नानंतर दिपाली फारशी अभिनयात रमली नाही. आपल्या संसारात आणि मुलांमध्ये बिझी झाली. तरीही तिचे सिनेमावरील प्रेम काही कमी झालं नाही. त्यामुळे लग्नानंतरही सिनेमा आणि विविध रियालिटी शोच्या माध्यमातून ती रसिकांच्या भेटीला येत असते.
दिपाली सैय्यद सामाजिक कार्यक्रमांमध्ये फारच सक्रिय असते. अभिनयाशिवाय तिने राजकारणातीह प्रवेश केला. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य ती करत असते. पुरगस्तांची मदत असो किंवा मग मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणं असो असे अनेक कार्यांत दिपालीने निस्वार्थ नागरिकांची सेवा केली आहे.
नागरिकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्याचे काम समाजसेवेच्या माध्यमातून दिपाली करत असते.अभिनयाच्या आपल्या करियरला न बघता तिनं आपलं सारं आयुष्य एका सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले आहे. दिपालीने करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात त्यांनी काम केले.