... म्हणून नानांनी जेजुरीत महिनाभर चालवला टांगा, लोकांकडून पैसेही घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 09:00 AM2021-09-04T09:00:00+5:302021-09-04T09:00:00+5:30

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाना पाटेकर यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

Know the reason why Nana Patekar used to ride horsecart in Jejuri | ... म्हणून नानांनी जेजुरीत महिनाभर चालवला टांगा, लोकांकडून पैसेही घेतले

... म्हणून नानांनी जेजुरीत महिनाभर चालवला टांगा, लोकांकडून पैसेही घेतले

googlenewsNext

आपला दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि एक उत्तम माणूस असणाऱ्या नाना पाटेकर यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाना पाटेकर यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यांच्या आयुष्यातल्या खास किस्सेही रंगत असतात. नुकताच त्यांचा एक किस्सा समोर आला आहे. डॉ वि. भा. देशपांडे यांनी नाट्यमित्रमंडळमध्ये नाना यांचा हा खास किस्सा सांगितला होता.

नाना यांचे 'पुरुष' नाटक प्रचंड गाजले होते. मराठी प्रमाणे हिंदीतही हे नाटक गाजले. त्यामुळे मराठीप्रमाणे हिंदीमध्येही त्यांचा चाहता वर्ग निर्माण होत गेला. विशेष म्हणजे अनेक चाहते फक्त नाना यांची एक झलक पाहाता यावी यासाठीच गर्दी करायचे. त्यामुळे नाटक सुरु होण्यापूर्वी नाना एक सांगायचे की, ''जे मला बघण्यासाठी आले आहेत. त्यांनी मला पाहा आणि जे नाटक पाहायला आलेत फक्त त्यांनीच नाट्यगृहात थांबा.'' 

बघता बघता नाना प्रचंड लोकप्रियत होत गेले. हिंदीतही त्यांना अनेक ऑफर्स मिळू लागल्या.नाना अभिनय क्षेत्रात अपघातानेच आले हे सगळ्यांनाच माहिती आहे. नानाअभिनयक्षेत्रात आले ते  'गड जेजुरी' चित्रपटाच्या निमित्ताने .राम कदम यांनी तो सिनेमा बनवला होता. पण हा सिनेमा काही कारणामुळे  प्रदर्शित झालाच नाही. त्यामुळे नाना यांच्या या सिनेमाविषयी फारसे कोणाला माहिती नाही. 

सिनेमाचं शूटिंगही जेजुरीमध्ये झाले होते. सिनेमात टांग्यावाल्याची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली होती. भूमिका परफेक्ट व्हावी म्हणून महिनाभर नाना यांनी टांगा चालवण्याचा सराव केला होता. त्यासाठी एक टांगाच खास त्यांनी बुक केला होता. रेल्वेस्टेशन, बस स्टँड, देवळात कोणाला जायचे असेल तर लोकांची ने- आण करायचे. टांगावाल्याप्रमाणे नाना वागायचे त्यामुळे कोणालाच त्यांना ओळखणेही शक्य नव्हतं. ज्यासाठी इतकी मेहनत नाना यांनी घेतली होती तो चित्रपट तर प्रदर्शित झाला नाही. पण यानंतर दुसरा चित्रपट त्यांनी केला तो सुपरहिट ठरला तो चित्रपट होता. 'माफीचा साक्षीदार.'यानंतर नाना यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आजही नाना यांची जादू कायम आहे. 
 

Web Title: Know the reason why Nana Patekar used to ride horsecart in Jejuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.