जाणून घ्या झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोणमध्ये कोणाला मिळाले नामांकन?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 10:21 AM2017-12-29T10:21:02+5:302017-12-29T15:51:02+5:30

झी एन्टरटेनमेंट एन्टरप्रायजेस लिमिटेडची एकमेव मराठी चित्रपट वाहिनी झी टॉकीज प्रस्तुत सर्वांच्या लाडक्या आणि प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहतात ...

Know who got the name of Zee Talkies Maharashtra's Future? | जाणून घ्या झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोणमध्ये कोणाला मिळाले नामांकन?

जाणून घ्या झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोणमध्ये कोणाला मिळाले नामांकन?

googlenewsNext
>झी एन्टरटेनमेंट एन्टरप्रायजेस लिमिटेडची एकमेव मराठी चित्रपट वाहिनी झी टॉकीज प्रस्तुत सर्वांच्या लाडक्या आणि प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहतात अशा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१७ या पुरस्कार सोहळ्याचे नामांकन घोषित करण्यात आले आहे. झी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे मराठी सिनेसृष्टीतील एकमेव व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स आहेत. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार आठव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांसाठी १४ विभागात नामांकन जाहीर झाले असून, ‘फेव्हरेट चित्रपट’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘फेव्हरेट अभिनेत्री’, ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ ‘फेव्हरेट गीत’ या प्रसिद्ध विभागात कमालीची टक्कर असणार आहे. मराठी चित्रपट चाहते आजपासून या अद्भुत पुरस्कार सोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले ३१ डिसेंबरपर्यंत मत नोंदवू शकतात.
‘फेव्हरेट चित्रपट’ या विभागात वेगवेगळ्या शैलीचे तसेच समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळालेल्या चित्रपटांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी फास्टर फेणे, व्हेंटिलेटर, ती सध्या काय करते, बॉईज, चि व चि सौ का आणि मुरंबा या चित्रपटांमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. 
२०१७ मध्ये आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या कलाकारांचा फेव्हरेट अभिनेता आणि फेव्हरेट अभिनेत्री या विभागात समावेश करण्यात आला आहे. फास्टर फेणे आणि मुरंबा या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी अमेय वाघ याने फेव्हरेट अभिनेता या विभागात दोन नामांकनं पटकावली आहेत. त्याचबरोबर व्हेंटिलेटर चित्रपटातील कमाल अभिनयासाठी जितेंद्र जोशी, ती सध्या काय करते मधील सहज सादरीकरणासाठी अंकुश चौधरी, चि व चि सौ का मधील सोलरपुत्राच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ललित प्रभाकर आणि बॉईज चित्रपटात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी पार्थ भालेराव यांनी नामांकनं पटकावली आहेत. 
फेव्हरेट अभिनेत्री या विभागात बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकर हिने जाऊंद्याना बाळासाहेब मधील सादर केलेली गावरान मुलगी नामांकनं पटकावून गेलीय, तसेच मुक्ता बर्वे हिच्या हृदयांतर मधील प्रेरक कलाकृती, सोनाली कुलकर्णी हिची कच्चा लिंबू मधील अफलातून कामगिरी, पर्ण पेठे हिचा फास्टर फेणेमधील उत्कृष्ट अभिनय, चि व चि सौ का मधील मृण्मयीने सादर केलेली व्हेज कन्या आणि मुरंबा मधील गोड मिथिला पालकर यांनी देखील नामांकनं पटकावली आहे. 
फेव्हरेट गीत या विभागात जाऊंद्याना बाळासाहेब मधील ब्रिन्ग इट ऑन आणि डॉल्बी वाल्या, बॉईज चित्रपटातील लग्नाळू, ती सध्या काय करते या चित्रपाटातील हृदयात वाजे समथिंग तसेच व्हेंटिलेटर मधील या रे या आणि बाबा या गाण्यांचा समावेश आहे. 
तरुणींच्या काळजाचा ठाव घेणारे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अंकुश चौधरी, आकाश ठोसर, अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, अभिनय बेर्डे आणि स्वप्नील जोशी यांनी महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन या विभागात नामांकन पटकावले आहे. तसेच सिनेसृष्टीतील स्वप्नसुंदरी अभिनेत्री सई ताम्हणकर, मिथिला पालकर, अमृता खानविलकर, पूजा सावंत, पर्ण पेठे, स्पृहा जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रिया बापट यांनी फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर या विभागात नामांकन पटकावले आहे. 
या विभागांव्यतिरिक्त खालील आठ विभागातील आवडत्या कलाकारांसाठी देखील प्रेक्षक आपले मत नोंदवू शकतात.
 
नामांकनं पुढील प्रमाणे आहेत-
फेव्हरेट दिर्ग्दर्शक
आदित्य सरपोतदार- फास्टर फेणे
राजेश मापुसकर- व्हेंटिलेटर
सतीश राजवाडे- ती सध्या काय करते
विशाल देवरूखकर - बॉईज
परेश मोकाशी - चि व चि सौ का
वरुण नार्वेकर - मुरंबा
 
फेव्हरेट साहाय्यक अभिनेता
आशुतोष गोवारीकर - व्हेंटिलेटर
दिलीप प्रभावळकर - फास्टर फेणे
सिद्धार्थ जाधव - फास्टर फेणे
सचिन खेडेकर - मुरंबा
भाऊ कदम - जाऊंद्या ना बाळासाहेब
पुष्करराज चिरपुटकर - बापजन्म
 
फेव्हरेट साहाय्यक अभिनेत्री
नम्रता आवटे - व्हेंटिलेटर
सई ताम्हणकर - फॅमिली कट्टा
शिल्पा तुळसकर - बॉईज
रीमा - जाऊंद्या ना बाळासाहेब
सुकन्या कुलकर्णी - व्हेंटिलेटर
चिन्मयी सुमीत - मुरंबा
 
फेव्हरेट नवोदित अभिनेता
अभिनय बेर्डे - ती सध्या काय करते
ललित प्रभाकर - चि व चि सौ का
सुमेध मुद्गलकर - व्हेंटिलेटर | मांजा
रवी जाधव - कच्चा लिंबू
 
फेव्हरेट नवोदित अभिनेत्री
आर्या आंबेकर - ती सध्या काय करते
मिथिला पालकर- मुरंबा
ऋचा इनामदार - भिकारी
 
फेव्हरेट खलनायक
गिरीश कुलकर्णी - फास्टर फेणे
झाकीर हुसेन - बॉईज
हेमंत ढोमे - बघतोस काय मुजरा कर
किरण करमरकर - कान्हा
 
फेव्हरेट गायक आणि गायिका
नागेश मोर्वेकर आणि अर्ल डिसुझा - डॉल्बी वाल्या (जाऊंद्या ना बाळासाहेब)
अजय गोगावले - ब्रिन्ग इट ऑन (जाऊंद्या ना बाळासाहेब)
रोहन प्रधान - या रे या आणि (व्हेंटिलेटर)
रोहन प्रधान आणि प्रियांका चोप्रा - बाबा (व्हेंटिलेटर)
कौस्तुभ गायकवाड आणि जनार्धन खंडाळकर - लग्नाळू (बॉईज)
रितेश देशमुख - फाफे साँग (फास्टर फेणे)
विधीत पाटणकर आणि आर्या आंबेकर - हृदयात वाजे समथिंग (ती सध्या काय करते)
आर्या आंबेकर - जरा जरा (ती सध्या काय करते)
 
तुमच्या आवडत्या कलाकारांना विजयी करण्यासाठी तुमचं मत www.zeetalkies.com/mfk17  या संकेतस्थळावर नोंदवू शकता. 

Web Title: Know who got the name of Zee Talkies Maharashtra's Future?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.