"बलात्काऱ्यांना असंच संपवलं पाहिजे", पश्चिम बंगालमधील डॉक्टर बलात्कार प्रकरणी तेजस्विनीची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 02:43 PM2024-08-15T14:43:28+5:302024-08-15T14:47:19+5:30

"सरकारला हे जमत नसेल, तर त्यांना जनतेच्या हवाली करा", पश्चिम बंगालमधील डॉक्टर बलात्कार प्रकरणी तेजस्विनीची संतप्त पोस्ट

kolkata west bengal dr rape case marathi actress tejaswini pandit shared angry post ask for justice | "बलात्काऱ्यांना असंच संपवलं पाहिजे", पश्चिम बंगालमधील डॉक्टर बलात्कार प्रकरणी तेजस्विनीची संतप्त पोस्ट

"बलात्काऱ्यांना असंच संपवलं पाहिजे", पश्चिम बंगालमधील डॉक्टर बलात्कार प्रकरणी तेजस्विनीची संतप्त पोस्ट

Kolkata Doctor Rape Murder Case :  पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या (Kolkata Doctor Rape Murder Case) केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. या क्रूरतेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. देशभरातून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. याबाबत सेलिब्रिटीही सोशल मीडियावर पोस्ट करत न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने याबाबत पोस्ट केली आहे. 

तेजस्विनी तिच्या अभिनयाबरोबरच स्वभाव आणि परखड मतं मांडण्यासाठी ओळखली जाते. समाजातील अनेक घटनांवर तेजस्विनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करताना दिसते. आता पश्चिम बंगालमधील डॉक्टर बलात्कार प्रकरणी तेजस्विनीने पोस्ट शेअर करत बलात्कार करणाऱ्यांना होणाऱ्या शिक्षेबाबत भाष्य केलं आहे. तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आरोपी खाली झोपवून त्याच्यावर बंदूक धरल्याचं दिसत आहे. बलात्कार करणाऱ्यांनाही अशीच शिक्षा दिली गेली पाहिजे, असं तेजस्विनीने म्हटलं आहे. 

"भारतातही अशाच प्रकारे बलात्काऱ्याचं जीवन संपवलं गेलं पाहिजे. जर सरकारला हे जमत नसेल, तर त्यांना जनतेच्या हवाली करा...देशात बलात्काराच्या घटना वाढणं हे धक्कादायक आहे...न्यायाची वाट बघत आहोत", असं तेजस्विनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, डॉक्टर विद्यार्थिनीवर बलात्कार करुन खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. त्याचबरोबर या प्रकरणी देशभरातील लोक आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. विविध सरकारी रुग्णालयांमधील शिकाऊ डॉक्टर, अंतर्वासित डॉक्टर आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर निदर्शने करत आहेत. दोषींना शिक्षा होईपर्यंत निदर्शने सुरूच ठेवणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाचा एका आठवड्यात तपास करण्यात पोलिसांना अपयश आल्यास, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाईल, असे जाहीर केले आहे. 

Web Title: kolkata west bengal dr rape case marathi actress tejaswini pandit shared angry post ask for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.