Video : 'नेलपॉलिश' मुळे दीड आठवड्यात 2.5 किलो वजन कमी? क्रांती रेडकरने सांगितलं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 02:40 PM2023-04-14T14:40:36+5:302023-04-14T14:41:55+5:30

क्रांती रेडकर नेहमी गंमतीशीर रील्स शेअर करत असते.

kranti redkar lost 2.5 kg in just 1.5 weeks reveals secret behind it video viral | Video : 'नेलपॉलिश' मुळे दीड आठवड्यात 2.5 किलो वजन कमी? क्रांती रेडकरने सांगितलं सिक्रेट

Video : 'नेलपॉलिश' मुळे दीड आठवड्यात 2.5 किलो वजन कमी? क्रांती रेडकरने सांगितलं सिक्रेट

googlenewsNext

अभिनेत्री कायम फिट कशा असतात असा प्रश्न अनेकांना पडत असेल. क्रांती रेडकरने (Kranti Redkar) नुकताच एक व्हिडिओ शेअर करत याचं मजेदार उत्तर दिलं आहे. क्रांतीने फक्त दीड आठवड्यात तब्बल 2.5 किलो वजन कमी केलंय. कसं? प्रश्न पडला ना..मग तिचा हा व्हिडिओ पाहाच.

क्रांती रेडकर नेहमी गंमतीशीर रिल्स शेअर करत असते. रोजच्या जीवनात काय काय विनोदी घडामोडी घडत असतात हे ती सोप्या शब्दात मजेदार पद्धतीने सांगते. असाच एक व्हिडिओ तिने पोस्ट केला आणि दीड आठवड्यात अडीच किलो वजन कसं कमी केलं याचं गुपित सांगितलंय . ती म्हणाली, 'मी गेल्या दीड आठवड्यात अडीच ते तीन किलो वजन कमी केलंय. आता तुम्ही म्हणाल कसं केलंत तुम्ही हे? याचं सिक्रेट काय? तर सिक्रेट काही नाही. सिक्रेट खूप सोपं आहे. उजव्या हाताला पांढऱ्या रंगाचं नेलपॉलिश लावायचं. त्यात ते जेल असलं आणि थोडं महाग असलं तर मग तुम्ही हे करणारच...एकतर आपण आहोत भारतीय. हाताने खायची सवय. त्यात तुम्ही जर मालवणी असाल तर मासे आणि भात. माशाची कढी कालवून खायची मस्त रेमटवून.ती तुम्हाला काट्या चमच्याने खावी लागणार आणि मग तुम्हाला चवंच लागणार नाही. मग तुम्ही काय करणार? कमी खाणार. असं करत करत मी गेले दीड आठवडे नीट जेवतच नाही ...आणि काट्या चमच्याने मला टेस्टच लागत नाही ना. . तर हे जे पांढरं नेलपॉलिश आहे ते वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. किमान माझ्यासाठी तरी. नंतर माझे आभार माना.'

क्रांतीच्या या व्हिडिओवर भन्नाट कमेंट्स आल्या आहेत. कोणी म्हणतंय 'तू माशांच्या काट्यांचा अपमान केलास','तर कोणी म्हणालं,'मी नेलपॉलिशच काढून टाकेल' अशा कमेंट्सने क्रांती रेडकरचा व्हिडिओ अजूनच व्हायरल होतोय.

Web Title: kranti redkar lost 2.5 kg in just 1.5 weeks reveals secret behind it video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.