क्रांंती रेडकरनं शेअर केला पती समीर वानखेडेंचा 'तो' व्हिडीओ, म्हणाली - 'तुम्ही माझ्या आयुष्यात ...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 03:32 PM2022-05-24T15:32:51+5:302022-05-24T15:33:24+5:30

Kranti Redkar And Sameer Wankhede: क्रांती रेडकर हिने तिचा पती समीर वानखेडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Kranti Redkar shared her husband Sameer Wankhede's 'it' video, saying - 'You are in my life ...' | क्रांंती रेडकरनं शेअर केला पती समीर वानखेडेंचा 'तो' व्हिडीओ, म्हणाली - 'तुम्ही माझ्या आयुष्यात ...'

क्रांंती रेडकरनं शेअर केला पती समीर वानखेडेंचा 'तो' व्हिडीओ, म्हणाली - 'तुम्ही माझ्या आयुष्यात ...'

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे आणि या माध्यमातून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा तिचे सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होताना दिसतात. क्रांतीसोबत तिचा नवरा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) नेहमीच चर्चेत असतात. क्रांतीने आता देखील समीर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

क्रांती रेडकर हिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत समीर फुग्याशी खेळताना दिसत आहेत. तसेच खेळून झाल्यानंतर लगेचच ते लॅपटॉपवर अगदी मन लावून काम करताना दिसत आहेत. एकाच वेळी दोन गोष्टी समीर वानखेडे कशाप्रकारे जबाबदारीने सांभाळू शकतात, याची झलक या व्हिडीओत पाहायला मिळते आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, मी नशीबवान आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आहात.

समीर वानखेडे यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत.  एका युजरने लिहिले की, तुम्ही तर रिअल हिरो आहात. तर दुसऱ्या युजरने म्हटले की आम्हाला तुमचा अभिमान आहे. अशा बऱ्याच कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. क्रांती आणि समीर या कपलला नेटकऱ्यांची नेहमीच पसंती मिळताना दिसते. शिवाय क्रांती पतीवर आपलं किती प्रेम आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा सांगताना दिसते.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्ग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. लाचखोरीच्या आरोपांमुळे समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले. मात्र प्रत्येक प्रसंगांना ते सामोरे गेले होते. क्रांती देखील आपल्या नवऱ्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली होती.

Web Title: Kranti Redkar shared her husband Sameer Wankhede's 'it' video, saying - 'You are in my life ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.