कधीच एकत्र दिसत नाही हे कपल, क्रांती रेडकरने पहिल्यांदाच शेअर केला पतीसह व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 03:40 PM2020-12-15T15:40:18+5:302020-12-15T15:49:34+5:30
मुंबईतील सर्वात कडक अधिकारी म्हणून समीर वानखडे यांना ओळखले जाते. 2013 मध्ये बॉलिवूड सिंगर मिका सिंग याला मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिका-यांनी परदेशी चलनासह पकडले तेव्हा समीर वानखेडे यांनीच त्यांच्यावर कारवाई केली होती.
२०१७ साली अभिनेत्री क्रांती रेडकरचं समीर वानखेडे ह्यांच्याशी लग्न झालं. विशेष म्हणजे क्रांतीने लग्नाचा कोणत्याही प्रकारचा गाजावाजा केला नाही. गुपचूप पार पडलेल्या लग्नामुळे क्रांतीने कोणासह लग्न केले याचीही चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. शिवाय लग्नानंतरही क्रांतीनं त्यांच्यासोबतचे कधीच फोटो सोशल मीडियावर शेअर केले नव्हते. पण आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांती आणि समीर हे कपलची पहिल्यांदाच एकत्र झलक पाहायला मिळाली.
सोशल मीडियावर प्रंचड अॅक्टीव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्याही संपर्कात असते.मात्र तरीही तिच्या खाजगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. क्रांतीने पहिल्यांदाच समीर वानखेडे यांच्या वाढदिवसा निमित्त चक्क व्हिडीओ शेअर केला. क्रांतीने खास स्टाइलमध्ये समीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.शेअर केलेल्या व्हिडीओत क्रांती समीर यांना हसवण्याचाही प्रयत्न करत आहे. नेहमी सिरियस दिसणारे समीर यांना अखेर क्रांती हसवण्यात यशस्वी ठरली असल्याचेही तिने व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे. पहिल्यांदाच या कपलची एकत्र झलक पाहायला मिळाल्यानेक्रांतीसह तिच्या फॅन्सचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
मुंबईतील सर्वात कडक अधिकारी म्हणून समीर वानखडे यांना ओळखले जाते. 2013 मध्ये बॉलिवूड सिंगर मिका सिंग याला मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिका-यांनी परदेशी चलनासह पकडले तेव्हा समीर वानखेडे यांनीच त्यांच्यावर कारवाई केली होती. समीर २००४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकारी म्हणून झाली होती. ते आंध्र प्रदेश आणि दिल्लीमध्येही सेवेत होते. समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखील दोन वर्षात सुमारे 17 हजार कोटींचे ड्रग्ज पकडले गेले आहेत. नुकतेच समीर वानखेडे यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
क्रांतीने मराठीसोबतच ‘गंगाजल’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटात तिने अपूर्वा कुमारीची भूमिका निभावली होती. जत्रा सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने आॅन ड्युटी 24 तास, माझा नवरा तुझी बायको, नो एन्ट्री पुढे धोका आहे यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली होती.