'कृती' नेपाळी चित्रपटाची नक्कल नाही - शिरीष कुंदर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2016 06:57 AM2016-06-27T06:57:00+5:302016-06-27T12:27:00+5:30
चित्रपट निर्देशक शिरीष कुंदरने 'कृती' या शॉर्टफिल्मने अनेक लोकांची मने जिंकली आहेत. यादरम्यान 'कृती'ची कथा एका नेपाळी चित्रपटाची नक्कल ...
त्यांनी पोस्ट केले की, शिरीष कुंदरने चित्रपटाची कथा चोरल्याची खंत नाही पण बॉबच्या शुटींगवेळी सेटवर खाण्यासाठीही पैसे नसत आणि 'कृती'च्या सेटवरील स्पॉटबॉयनेही आमच्या चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त पैसे कमविले असतील.
संपूर्ण चित्रपटाच्या टीमने इतकी मेहनत केलेली असताना भारताचा श्रीमंत चित्रपट निर्माता येणार आणि त्याच कथेचा चित्रपट बनवून अजूनच श्रीमंत होणार हे चुकीचे आहे.
कुंदरने यावर सांगितले की १२ मे २०१६ रोजी रिलीज झालेल्या कोण्या चित्रपटाची तुलना करण्याअगोदर हे लक्षात घ्यावे की, 'कृती' फेब्रुवारी २०१६ रोजी रिलीज झाली होती.
यावर नेउपाने याने सांगितलेकी बॉब ऑक्टोबर २०१५ साली तयार झाली होती आणि जवळच्या मित्रांबरोबर शेअर करण्याच्या दृष्टीने तिला विमियो वर अपलोड करण्यात आले होते.
नेउपानेने केलेल्या या आरोपानंतर शिरीष कुंदर यांनी म्हटले की जवळचा सोड सोडा मी तर नेउपानेचा मित्रही नाही.
आता यावर नेमके कोण खरे आणि कोण खोटे बोलत आहे हे सांगणे जरा अवघडच आहे.