"रिसेप्शनमध्ये आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो..." हेमंत अन् क्षितीनं सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:04 IST2025-01-14T16:04:43+5:302025-01-14T16:04:54+5:30

हेमंत अन् क्षितीनं रिसेप्शनमध्ये एकमेकांशी अबोला धरला होता. हे क्षितीने एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

Kshiti Jog Hemant Dhome Share Wedding Reception Memories While Fussclass Dabhade Movie Promotion | "रिसेप्शनमध्ये आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो..." हेमंत अन् क्षितीनं सांगितला किस्सा

"रिसेप्शनमध्ये आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो..." हेमंत अन् क्षितीनं सांगितला किस्सा

मराठी कलाविश्वात हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि क्षिती जोग यांची (Kshiti Jog) जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडीचा चाहतावर्ग मोठा आहे. अनेकविध कलाकृतीतून हे दोघेही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. याबरोबरच, सोशल मीडियावरदेखील ते सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.  क्षिती आणि हेमंत यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला १२ वर्ष झाली आहेत. पण, तुम्हाला माहितेय, लग्न झाल्यावर रिस्पेशनमध्ये त्यांनी एकमेंकाशी अबोला धरला होता.  हे क्षितीने एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

हेमंत ढोमे आणि क्षिती या जोडप्याचा 'फसक्लास दाभाडे' (Marathi Movie Fussclass Dabhade) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात क्षिती जोगनं अभिनय केलाय. तर हेमंत ढोमे हा सिनेमाचा दिग्दर्शक आहे. त्याच्या या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटाच्या टीमने नुकताच नवशक्ती या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने लग्नाच्या दिवशी पत्नी मिताली मयेकरसोबत भांडण केल्याचं सांगितलं. तर क्षिती जोगने असे भांडण होणे लकी असल्याचे म्हटलं.

यावेळी क्षिती जोगने तिच्या लग्न रिस्पेशनची आठवण सांगितली. ती म्हणाली, "हे लकी आहे. कारण, आमच्याही रिस्पेशनला आम्ही एकमेंकाशी भांडत होतो आणि बोलत नव्हतो. रिस्पेशन संपल्यावर आम्ही एवढे दमलो की एकमेंकाशी बोलायला घेतलं". दरम्यान, 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग व अमेय वाघ या तिघांनी बहीण-भावांची भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा सिनेमा 24 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

Web Title: Kshiti Jog Hemant Dhome Share Wedding Reception Memories While Fussclass Dabhade Movie Promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.