हलाल चित्रपटाचा टीझर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 03:35 AM2017-08-15T03:35:52+5:302017-08-15T09:05:52+5:30

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, समाजसेवक डॉ. बाबा आढाव, लेखक संजय पवार तसेच मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी या मान्यवरांच्या उपस्थितीत हलाल चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला.

Laal film teaser launch | हलाल चित्रपटाचा टीझर लाँच

हलाल चित्रपटाचा टीझर लाँच

googlenewsNext
स्लीम विवाह संस्थेवर भाष्य करणाऱ्या हलाल या चित्रपटात ‘तलाक’चा शस्त्रासारखा वापर करून मुस्लीम स्त्रियांचे जे भावनिक खच्चीकरण केली जाते त्याचे वेधक चित्रण करण्यात आले आहे. नुकताच कलाकारांच्या तसेच ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, समाजसेवक डॉ. बाबा आढाव, लेखक संजय पवार तसेच मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी या मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. हलाल चित्रपटाची निर्मिती अमोल कांगणे यांनी केली असून दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांचे आहे. हा चित्रपट लेखक राजन खान यांच्या ‘हलाला’ कथेवर आधारित असून येत्या २९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आजीवन अध्यन आणि विस्तार विभाग, मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि हमीद दलवाई स्टडी सर्कल यांच्या सहयोगाने ‘सामाजिक एकात्मतेचे विविध पैलू’ या विषयावर आयोजित चर्चासत्रा दरम्यान हा टीझर उपस्थित सर्वांना दाखवण्यात आला. याप्रसंगी बोलताना अमोल कांगणे म्हणाले की, चित्रपटाने केवळ मनोरंजन करू नये तर समाजातील दु:ख, वेदना, व्यथा, शोषित वर्गाचे जगणे सुद्धा मांडणे गरजेचे आहे. या उद्देशानेच हलालची निर्मिती करण्यात आली आहे. हलाल चित्रपटानेही मुस्लीम स्त्रियांच्या व्यथा, वेदना मांडत वास्तववादी सामाजिक प्रश्नाला स्पर्श केला आहे.
अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कांगणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कांगणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या हलाल मध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. पटकथा आणि संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणी रंजनदास, संकलन निलेश गावंड यांचं आहे. गीते सुबोध पवार आणि सय्यद अख्तर यांनी लिहिली असून संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे. गायक आदर्श शिंदे यांचा स्वरसाज या चित्रपटाला लाभला आहे.


Web Title: Laal film teaser launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.