यंदा कान्समध्ये असणार मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; 'सैराट' फेम छाया कदमची रेड कार्पेटवर होणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 05:41 PM2024-05-16T17:41:27+5:302024-05-16T17:42:46+5:30

मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट. फँड्री, सैराट गाजवणाऱ्या छाया कदम जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत (chhaya kadam, cannes film festival)

laapta ladies fame marathi actress chhaya kadam participate in cannes 2024 film festival | यंदा कान्समध्ये असणार मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; 'सैराट' फेम छाया कदमची रेड कार्पेटवर होणार एन्ट्री

यंदा कान्समध्ये असणार मराठमोळ्या अभिनेत्रीची हवा; 'सैराट' फेम छाया कदमची रेड कार्पेटवर होणार एन्ट्री

सध्या जगभरातल्या अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. ऐश्वर्या राय पासून कियारा अडवाणीपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्री कान्स गाजवण्यासाठी भारतातून रवाना झाल्या आहेत. अशातच मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे 'फँड्री', 'सैराट' असे सिनेमे गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्री छाया कदम यांना कान्समध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे.

पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी छाया कदम ७७व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. या विषयावर बोलताना छाया कदम आनंदाने म्हणाल्या, "माझं काम प्रेक्षकांना इतकं आवडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी मी खूप उत्सुक आहे. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे. मला इतर कशाचाही विचार करायचा नाही. मला फक्त हा क्षण जगायचा आहे."

 अशाप्रकारे मराठमोळ्या छाया कदम कान्समध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. अलीकडेच 'लापता लेडीज'मध्ये छाया कदम 'मंजू माई'च्या भूमिकेत दिसली होती. त्यांची दमदार व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. त्यांची बोललेले संवादही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या चित्रपटाव्यतिरिक्त छाया 'मडगाव एक्सप्रेस' या हिंदी सिनेमामध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या. छाया कदम कान्समध्ये सहभागी होणं ही मराठी प्रेक्षकांसाठी आनंद अन् अभिमानाची गोष्ट आहे.

 

Web Title: laapta ladies fame marathi actress chhaya kadam participate in cannes 2024 film festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.