'झॉम्बी आले शहरात...' म्हणत ललित प्रभाकरने शेअर केला व्हिडीओ, पहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 06:00 AM2021-02-16T06:00:00+5:302021-02-16T06:00:00+5:30
नुकताच ललित प्रभाकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
ललित प्रभाकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचा आघाडीचा अभिनेता. हंपी,आनंदी गोपाळ या सिनेमातील त्याच्या अफलातून भूमिकांमुळे तो अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाला. नुकताच ललित प्रभाकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
ललित प्रभाकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, झोंबिवली, झॉम्बी आले शहरात, घुसण्या आधी घरात, गाठा त्यांना, ३० एप्रिलला जवळच्या थेटरात ..
खरेतर ललित प्रभाकरचा आगामी चित्रपट झोंबिवलीचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याच्या या टीझरला चाहत्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.
२०२० मध्ये सिनेसृष्टीतल्या सर्वच कामांना ब्रेक लागला होता, पण झोंबिवली हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण अनलॉक फेजमध्ये करण्यात आले होते. यौडली फिल्म्सची निर्मिती असलेल्या झोंबिवलीचे चित्रीकरण मुंबईसह लातूरमध्ये करण्यात आले आहे. चित्रीकरण दरम्यान सर्व कलाकार व टीमने सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करूनच चित्रीकरण केले. त्याचबरोबर झोंबिवली हा असा पहिला मराठी चित्रपट असेल ज्याची चित्रपटगृहात रिलीज होण्याची घोषणा झाली आहे. मुंबईच्या एका लोकप्रिय आणि गजबजलेल्या उपनगराचा ताबा घेणाऱ्या झोंबीवर हा चित्रपट आधारित आहे. टिझरमध्ये प्रेक्षकांना हॉरर आणि कॉमेडीचे मिश्रण बघायला मिळेल. अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी हे तिन्ही कलाकार प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आणि हास्याचे वातावरण निर्माण करतात.
या सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात, " मराठी मध्ये हॉरर- कॉमेडी सिनेमे तसे खूप कमी बनवले जातात आणि झोंबीवर आधारित हा पहिलाच सिनेमा असेल. चित्रपटाची गोष्टसुद्धा खूप हटके आहे. गेल्या वर्षी आम्ही चित्रपटाचे पोस्टर लाँच केले, तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि आता ह्या टीझरमुळे चाहत्यांना झोंबिवलीच्या जगाची झलक पाहायला मिळेल.आम्ही खूप आव्हानात्मक परिस्थितीत या सिनेमाचे शूटिंग केले. लवकरच हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे, त्यामुळे अभिमान आणि उत्साह वाटतो. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिलीझ होईल व प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल याची मला खात्री आहे."
झोंबिवलीचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.