गेल्या 35 वर्षांपासून हा मराठमोळा कलावंत जंगलात करतो आहे हे काम,वाचून नक्कीच कराल सलाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 07:36 AM2017-11-10T07:36:15+5:302017-11-10T13:06:15+5:30
समाजात अशा विविध गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून समाजाची सेवा करता येऊ शकते. विविध समस्या देशात आहेत. या समस्यांनी ...
स ाजात अशा विविध गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून समाजाची सेवा करता येऊ शकते. विविध समस्या देशात आहेत. या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. अशाच नागरिकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्याचे काम समाजसेवेच्या माध्यमातून करता येते. विविध सामाजिक कार्यकर्ते या माध्यमातून नागरिकांची सेवा करतात. सामाजिक कार्यकर्त्यांचे कार्य पाहून देशवासियांमध्येही समाजसेवेची भावना निर्माण होत असते. काही सेलिब्रिटी मंडळीही सामाजिक कार्यात हातभार लावत असल्याची उदाहरणं आहेत. सामाजिक कार्य हे कोणत्याही प्रकारचे असू शकते ही बाब लक्षात घेऊन सेलिब्रिटी मंडळी समाजसेवा करत आहेत. सध्या देशात नक्षलवादाची समस्या आ वासून उभी आहे. देशाचे भविष्य असणारे तरुण व्यवस्थेविरोधात जाऊन हातात बंदूका घेऊ लागले आहेत. गडचिरोली, छत्तीसगड आणि आदिवासी भागात नक्षलवादाची चळवळ फोफावत चालली आहे. नक्षलवादाला रोखण्यासाठी सरकारकडून पाऊलं उचलली जात आहेत. असं असलं तरी सगळ्या गोष्टींसाठी सरकारवर अवलंबून राहणं योग्य नाही. हीच बाब लक्षात घेऊन एक मराठमोळा कलावंत पुढे सरसावला आहे. या कलावंताचे नाव आहे अनिरुद्ध वनकर. एनएसडीमध्ये अभिनयाचे त्याने धडे घेतले आहेत. मात्र अभिनयाच्या आपल्या करियरला न बघता त्यानं आपलं सारं आयुष्य एका सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले आहे. नक्षलवादाकडे झुकलेल्या आदिवासी आणि इतर तरुणांना बंदूका खाली टाकायला अनिरुद्ध भाग पाडत आहेत. नाटक आणि आपल्या अनोख्या गाणं म्हणण्याच्या शैलीने अनिरुद्धने आजवर नक्षलवादासारख्या वाईट मार्गाकडे वळलेल्या तरुणांना पुन्हा एकदा प्रेमाच्या मार्गावर आणण्याचं मोठं कार्य केलं आहे. गेल्या 35 वर्षांपासून अनिरुद्धचे जंगलात हे काम सुरु आहे. आपल्या स्वतःच्या करिअरचा विचार न करता समाजासाठी स्वतःला वाहून घेणा-या तसंच देशाचं भविष्य असणा-या तरुणाला योग्य मार्गाला आणण्याच्या ध्येयानं पछाडलेल्या अनिरुद्ध वनकरच्या कार्याला सलाम.