Video: प्रिया-उमेशचा विकेंड मूड; Lazy Lad वर केला भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 16:11 IST2021-12-01T16:10:22+5:302021-12-01T16:11:05+5:30
Priya bapat: प्रिया बापटने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती उमेशसोबत अमित त्रिवेदी आणि रिचा शर्मा यांच्या Lazy Lad या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Video: प्रिया-उमेशचा विकेंड मूड; Lazy Lad वर केला भन्नाट डान्स
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रिया बापट (priya bapat) आणि उमेश कामत (umesh kamat). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर या दोन्ही कलाकारांनी कलाविश्वात त्यांचं स्वतंत्र भक्कम स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे कलाविश्वाप्रमाणेच ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव्ह असते. त्यामुळे अनेकदा ही जोडी इन्स्टाग्रामवर त्यांचे काही व्हिडीओ, फोटो शेअर करत असतात. अलिकडेच या जोडीने एक भन्नाट ट्रेंड फॉलो करत व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा या दोघांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी विकेंड मूडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रिया बापटने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती उमेशसोबत अमित त्रिवेदी आणि रिचा शर्मा यांच्या Lazy Lad या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उमेश-प्रियाने बादशाहच्या जुगनू गाण्यावर डान्स केला होता. सध्या बादशाहचं 'जुगनू' हे रॅप सॉन्ग तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे.