3 हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे मजनू चित्रपटाचा ट्रेलर लॉंच, जाणून घ्या याबाबत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 03:49 PM2022-05-25T15:49:27+5:302022-05-25T15:51:46+5:30

चित्रपट सृष्टीच्या इतिहासात प्रथमचं 3 हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे जावून मराठीत मजनू चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शक चित्रपटाचा ट्रेलर लॉंच नुकताच करण्यात आला.

Launch the trailer of Majnu movie by helicopter at an altitude of 3000 feet | 3 हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे मजनू चित्रपटाचा ट्रेलर लॉंच, जाणून घ्या याबाबत

3 हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे मजनू चित्रपटाचा ट्रेलर लॉंच, जाणून घ्या याबाबत

googlenewsNext


चित्रपट सृष्टीच्या इतिहासात प्रथमचं 3 हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे जावून मराठीत मजनू चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शक चित्रपटाचा ट्रेलर लॉंच नुकताच करण्यात आला. या प्रसंगी अभिनेता रोहन पाटील, नितीश चव्हाण (लागीर झालं टीव्ही सिरीयल फेम) अभिनेत्री श्वेतलाना अहिरे, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे निर्माते गोवर्धन दोलताडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले, चित्रपट सृष्टीच्या इतिहासात प्रथमचं 3 हजार फुटाच्या उंचीवर जाऊन चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. याचं उंचीप्रमाणे मराठी चित्रपट जागतिक स्तरावर मला घेऊन जायचा आहे. प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला मजनू समजतो जे लोक हा चित्रपट पाहतील. त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की,प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा हा मजनू चित्रपट १० जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. संपूर्ण कुटुंबातील सदस्या हा चित्रपट आवडेल. "मजनू" चित्रपटात रसिकांना फाईट, एक्शन, रोमान्स तसेच लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत.

Web Title: Launch the trailer of Majnu movie by helicopter at an altitude of 3000 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा