सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या छंद प्रितीचा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 10:22 AM2017-10-24T10:22:31+5:302017-10-24T15:52:31+5:30
सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या छंद प्रितीचा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सोशल मीडियावर करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
म ाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक आकर्षक भाग म्हणजे संगीत... त्यात लोक संगीताचा बाज आला तर रसिक मनांसाठी ही पर्वणीच ठरते. अशा संगीतमय चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. याच धाटणीचा लोक संगीताशी निगडित छंद प्रितीचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात एका शाहिराचा संगीतमय प्रवास उलगडत जाणार आहे. प्रेमला पिक्चर्स निर्मित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून लाँच करण्यात आला. या ट्रेलरची सध्या सगळीकडेच प्रचंड चर्चा असून या ट्रेलरला एका दिवसात एका लाखाहून देखील अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
कलेच्या उपासकांची कलेवरील श्रद्धा दर्शवणाऱ्या या चित्रपटात शाहिराच्या भूमिकेत दिसणारा हर्ष कुलकर्णी आपल्या कलेसाठी सर्वस्व पणाला लावतो. या प्रवासात त्याला लाभलेली नृत्यांगना चंद्रा (सुवर्णा काळे) आणि ढोलकीसम्राट (सुबोध भावे) यांची साथ... त्यातून कलाप्रेमी शाहिराच्या आयुष्यात होत जाणारे बदल... याची कथा म्हणजे ‘छंद प्रितीचा’... या चित्रपटाच्या कथेला लोक संगीताचा बाज लाभला आहे. ज्यात शाहिरी लावणी, सवाल – जवाब, श्रृंगारीक लावणी या सगळ्याच प्रकारांची मजा प्रेक्षक अनुभवू शकणार आहेत.
छंद प्रितीचा या चित्रपटाच्या कथेला साजेसे संगीत प्रविण कुवर यांनी दिले असून बेला शेंडे, आदर्श शिंदे, जावेद अली, केतकी माटेगावकर, वैशाली सामंत आणि नंदेश उमप यांचे स्वर या गीतांना लाभले आहेत.
या चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे आणि हर्ष कुलकर्णी सोबतच विकास समुद्रे, शरद पोंक्षे, गणेश यादव, सुहासिनी देशपांडे, अभिषेक कुलकर्णी आणि विशाल कुलथे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.
छंद प्रितीचा या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक एन. रेळेकर यांनी केले असून दिग्दर्शनाबरोबरच कथा – पटकथा – गीतलेखनाची धुराही एन. रेळेकर यांनीच सांभाळली आहे. तर निर्मिती चंद्रकांत जाधव यांनी केली आहे. हा चित्रपट १० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुबोध भावे या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे.
Also Read : 'छंद प्रितीचा' चित्रपटातून हर्ष कुलकर्णीचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण