तालीममध्ये दिसणार लावणीचं लावण्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 11:49 AM2016-07-22T11:49:27+5:302016-07-22T17:22:30+5:30
नितीन रोकडे दिग्दर्शित तालीम या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा कुस्तीचे डावपेच पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तालीम या ...
न तीन रोकडे दिग्दर्शित तालीम या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा कुस्तीचे डावपेच पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तालीम या चित्रपटात प्रेक्षकांना लावणीचं एक नवं लावण्य पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील इश्काचा बाण सुटला...ही लावणी केवळ कर्णमधुर नसून ती नेत्रसुखदही झाली आहे. या लावणीचं चित्रीकरण जुन्नरमधील घाटघर येथे खास भव्य दिव्य असा सेट उभारून करण्यात आलं आहे. या सेटवर अभिनेत्री वैशाली दाभाडे यांच्यावर ही लावणी चित्रीत करण्यात आली असून तालीममध्ये प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण अशी एक ठसकेबाज लावणी पाहायला मिळणार आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचे आघाडीचे गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या लावणीला संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर यांनी संगीत दिले आहे. रोंकणी गुप्ता आणि स्वप्निल गोडबोले यांच्या सुमधूर आवाजात ही लावणी ध्वनीमुद्रित करण्यात आली आहे.हा चित्रपट ५ आॅगस्टला प्रदर्शित होणार आहे.